Malshiras villagers File photo
पुणे

कुटुंब कोविड सेंटरला; मुक्या जनावरांना गावकऱ्यांनी सांभाळलं

मळ्यातील गोठ्यावर घरची माणसं दिसेनात म्हणून तीन दुभत्या जनावरांनी हंबरडा फोडला होता. त्यामुळे दत्तात्रय कोलते यांचा जीव तुटत होता. मात्र म्हणतात ना की, जी अडचणीच्या वेळी धावून येतात तीच खरी माणसं. त्याचा प्रत्ययच या कुटुंबाला आला.

दत्ता जाधव : सकाळ वृत्तसेवा

मळ्यातील गोठ्यावर घरची माणसं दिसेनात म्हणून तीन दुभत्या जनावरांनी हंबरडा फोडला होता. त्यामुळे दत्तात्रय कोलते यांचा जीव तुटत होता. मात्र म्हणतात ना की, जी अडचणीच्या वेळी धावून येतात तीच खरी माणसं. त्याचा प्रत्ययच या कुटुंबाला आला.

माळशिरस : माझा आणि मुलीचा कोरोना अहवाल १ मे रोजी पॉझिटिव्ह (Covid-19 Positive) आला. सासवडवरून अहवाल घेऊन आलो आणि आमच्या गावचे सरपंच आणि पत्रकारांना भेटलो. त्यांनी सांगितलं काळजी करू नकोस. इथं आपल्या गावच्या विलगीकरण केंद्र आणि कोविड सेंटरमध्ये (Covid Center) दाखल हो. त्यांच्या सांगण्यानुसार दाखलही झालो, पण दुसऱ्या दिवशी आई, पत्नी आणि मुलाचादेखील अहवाल पॉझिटिव्ह आला आणि पायाखालची जमीनच सरकल्याचा भास झाला. सगळं कुटुंब विलगीकरण केंद्रात होतं. आणि मुकी जित्राबं (जनावरं) घरचे कोणीच दिसेना म्हणून गोठ्यात हंबरत होती... ही हृदयद्रावक कहाणी आहे पिसर्वे (ता.पुरंदर) येथील दत्तात्रय पंढरीनाथ कोलते आणि त्यांच्या परिवाराची. पिसर्वे येथील कोविड सेंटरमधून संपूर्ण कुटुंब उपचार घेऊन बरे होऊन आपल्या घरी परत जात असताना पंढरीनाथ कोलतेंच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव दिसत होता. (entire Kolte family infected with covid-19 Pisarve villagers took care of animals)

पिसर्वे येथे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला. अचानक रुग्णसंख्या वाढली. यामध्ये गावातील दत्तात्रय पंढरीनाथ कोलते यांचं संपूर्ण कुटुंब बाधीत झालं. गावातील हे एकमेव संपूर्ण कुटुंब पुढील १४ दिवस गावकाऱ्यांसाठी सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झालं. त्यामध्ये स्वतः दत्तात्रय कोलते, त्यांची आई वत्सला, पत्नी दीपाली, मुलगा यश आणि मुलगी अपेक्षा यांचा समावेश होता. कोरोनाने संपूर्ण कुटुंब कोविड सेंटरमध्ये जेरबंद केलं असताना तिकडे मळ्यातील गोठ्यावर घरची माणसं दिसेनात म्हणून तीन दुभत्या जनावरांनी हंबरडा फोडला होता. त्यामुळे दत्तात्रय कोलते यांचा जीव तुटत होता. मात्र म्हणतात ना की, जी अडचणीच्या वेळी धावून येतात तीच खरी माणसं. त्याचा प्रत्ययच या कुटुंबाला आला. गोठ्यात हंबरणाऱ्या गुरांची जबाबदारी गावातील सुखदेव कुंडलीक कोलते या मित्राने  घेतली. तर कोविड सेंटरमध्ये कोरोना संनियंत्रण समितीच्या सदस्यांनी या कुटुंबाची जबाबदारी घेतली होती.

याबाबत बोलताना दत्तात्रय कोलते म्हणाले की, 'एका कोरोना बाधित व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे आमचं संपूर्ण कुटुंब बाधित झालं आणि गावात आमचं हक्काचं घर असून देखील आम्हाला घरादाराला कुलूप लावून कोरोना विलगीकरण केंद्रात राहावे लागले, पण इथला अनुभव खूप वेगळा होता. अगदी घरच्या माणसांची घ्यावी अशी काळजी घेतली जात होती, दोन वेळा आरोग्य कर्मचारी आणि खाजगी डॉक्टर येऊन तपासणी करत होते. सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत प्रत्येक वेळी सरपंच बाळासाहेब कोलते, पत्रकार संदीप बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य सुनील कोलते, महेश वाघमारे, चंद्रकांत कोलते, स्वयंसेवक नवनाथ कटके, कैलास कोलते, सुभाष कोलते, तेजस कोलते, नितीन कोलते, शामराव वायकर हे चौकशी करायचे. कमी जास्त विचारपूस करायचे. आमचा मित्र सुखदेव कोलतेने गायांची जबाबदारी घेतल्याने १४ दिवसांत सर्वांना घराची आठवण येऊ दिली नाही.

पुणे जिल्ह्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT