Commersial_Space 
पुणे

उद्योगांसाठी पुण्यालाच पसंती; कमर्शिअल स्पेसकडे वळल्या व्यावसायिकांच्या नजरा!

सनील गाडेकर

पुणे : स्टार्टअप, विविध तंत्रज्ञान पुरविणा-यां कंपन्या, उत्पादन क्षेत्रातील नामांकित कंपन्या, कॉ-वर्किंग स्पेस आणि इतरही विविध क्षेत्रातील व्यावसायिकांची पुण्यात उद्योग सुरू करण्यास असलेली पसंती वाढतच आहे. त्यामुळेच जुलै ते ऑक्‍टोंबर या चार महिन्यांच्या काळात शहरातील 10 लाख चौरस फूट कार्यालयीन जागा (कमर्शिअल स्पेस) भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील बांधकाम व्यवसायातील उलाढाल थंडावली होती. मात्र आता या क्षेत्रातील कामकाज पुन्हा सुरळीत होत असून ग्राहकांचा प्रतिसाद देखील वाढत असल्याचे जॉन्स लॅग लसानने (जेएलएल) केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांचा विचार करता जुलै ते सप्टेंबरमधील (वर्षातील तिसरी तिमाही) शहरातील घरांच्या विक्रीत 58 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे जेएलएलने यापूर्वीच केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

शहरातील कार्यालयीन जागांबाबतचा व्यवसाय देखील पूर्वपदावर येत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासातून पुढे आले आहे. दीर्घकालीन कॉर्पोरेट रिअल इस्टेट रणनीतींचा भाग म्हणून व्यापाऱ्यांनी त्यांच्या विद्यमान कार्यालयीन कराराचे जुलै ते ऑक्‍टोबर या काळात नूतनीकरण केले आहे. वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांमध्ये अंदाजे 20 लाख चौरस फूट कार्यालयीन जागा व्यापली गेली आहे.

कार्यालयीन जागा वापरणारे व्यवसाय :
- बॅंकिंग व फायनान्स सेवा
- विमा कंपनी
- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान फर्म
- उत्पादन कंपन्या
- को-वर्किंग स्पेस
- स्टार्टअप
- आर ऍण्ड डी हब

सर्वच क्षेत्रातील कंपन्या पुण्यात त्यांचे कामकाज वाढवत आहेत. येथील कुशल कामगार व इतर सर्व बाबींची उपलब्धता हे त्यामागील कारण आहे. स्पर्धात्मक भाडे, सामाजिक वातावरण आणि येथील लाईफस्टाईलचा विचार करता उद्योजकांसाठी पुणे नेहमी आवडते शहर ठरत आहे.
- संजय बजाज, व्यवस्थापकीय संचालक, जेएलएल पुणे

भाडेतत्त्वावर घेतलेल्या कार्यालयीन जागा (चौरस फुटांत)
जानेवारी ते मार्च - 1 लाख 30 हजार
एप्रिल ते जून - 6 लाख 40 हजार
जुलै ते सप्टेंबर - 4 लाख 60 हजार
ऑक्‍टोबर - 6 लाख 40 हजार

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

Truck Eicher Accident : भरधाव ट्रकची आशरला पाठीमागून धडक; भिषण अपघातात दोघांचा मृत्यू, ८ शेळ्या दगावल्या

फक्त ३३ किमी रुंद असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजे कशी जातात?

आश्रमशाळांना युद्धाची झळ, गॅस तुटवड्याचा १८ हजार विद्यार्थ्यांना फटका; भोजन व्यवस्थेसमोर मोठे संकट

नाना पाटेकर ते नसीरुद्दीन शाह, एमएक्स प्लेयरवर २०२६ मध्ये येणार १५० नवीन शो; सगळे पाहता येणार फ्री

SCROLL FOR NEXT