tree-cutting-for-modi-rally.jpg 
पुणे

Vidhan Sabha 2019 : 'झाडं तोडणाऱ्यांनो पुणेकर तुम्हाला 21 तारखेला उत्तर देतील'

सकाळ वृत्तसेवा

 Vidhan Sabha 2019 : पुणे : ''पुणेकर हे पर्यावरणप्रेमी आहेत. ते अशा प्रकारची वृक्षतोड खपवून घेणार नाहीत. अशा शब्दात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने स. प. महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी करण्यात आलेल्या वृक्षतोडीचा निषेध केला. येत्या 21 तारखेला होणाऱ्या मतदानातूनही ते दाखवून देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार अॅड वंदना चव्हाण, काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी, अंकुश काकडे, कमल व्यवहारे, प्रशांत जगताप यांच्यासह आघाडीतील सर्व घटकपक्षांचे प्रमुख यांची पत्रकार परिषद झाली. पंतप्रधान मोदी यांची सभा उद्या (गुरुवारी) स.प महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. त्यासाठी मैदानावरील झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली आहे. यासंदर्भातील वृत्त सकाळने दिले होते. त्यावेळी भाजपवर जोरदार टीका करतानाच या प्रकरणी महापालिका आयुक्तांना पत्र देण्यात येणार असून याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
 Vidhan Sabha 2019 : पुण्यात मोदींच्या सभेसाठी 'सप'मधील झाडे सपासप कापली

चव्हाण म्हणाल्या," मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेसाठी अशा प्रकारे वृक्षतोड करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी देखील त्यावर नाराजी व्यक्त केली. अतिरिक्त आयुक्तांनी यासंदर्भात कडक कारवाईची शिफारस केली आहे. मात्र यासंदर्भातील कारवाईचा प्रस्ताव आयुक्तांकडे पडून आहे. असे असतानाच मोदी यांच्या सभेसाठी भयानक पद्धतीने वृक्षतोड करण्यात आली आहे. त्यासाठी कोणतीही कायदेशीरप्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही. यावरून शेतकरी आणि पर्यावरणासंदर्भात हे सरकार किती संवेदनशून्य आहे.'' तर मोहन जोशी म्हणाले," पुणेकर हे पर्यावरण प्रेमी आहेत. येत्या 21 तारखेला ते याचे उत्तर नक्की देतील.'' 

मोदी यांच्या सभेसाठी स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर आलिशान मंडप उभारण्यात येत आहे. त्यावर बोलताना अॅड चव्हाण म्हणाल्या," हा मंडप आणि सभेसाठी किमान दोन ते तीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. हा पैसा कुठून आला, निवडणूक आयोग यावर गप्प का? त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे.'

फेसबुक आणि ट्विटरवर #ModiRally हॅशटॅग वापरून आम्हाला कळवा किंवा webeditor@esakal.com  वर ई-मेल करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT