corona worriares.jpg 
पुणे

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी झाला `हा` महत्त्वाचा निर्णय

निलेश बोरुडे

किरकटवाडी (पुणे) : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे शहराला लागून असलेल्या मांजरी बुद्रुक, कदम वाकवस्ती, वाघोली व नऱ्हेगाव या गावांमधून शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सात दिवस कामाच्या ठिकाणी रहावे किंवा सात दिवस सुट्टी घेऊन गावातच राहावे, अधिकारी व कर्मचाऱ्यांना गावात ये-जा करता येणार नाही असे आदेश हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी 1 जून रोजी काढले होते.

उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे-पाटील, हवेलीचे तहसीलदार सुनिल कोळी, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी सचिन खरात यांच्यासह झालेल्या बैठकीनंतर कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी हा निर्णय घेतला होता. आज 5 जून रोजी यासंदर्भात उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी सुधारित आदेश काढला असून अत्यावश्यक सेवेत काम करणारे खाजगी व शासकीय स्थापनेतील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वरील गावांच्या हद्दीतून ये-जा करण्यास मुभा देण्यात  आलेली आहे.

अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू राहाव्यात म्हणून हा बदल करण्यात आलेला असल्याचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्याकडून सांगण्यात आले. इतर आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र 12 जून पर्यंत मांजरी बुद्रुक, कदम वाकवस्ती, वाघोली व नऱ्हेगाव या गावांमधून ये-जा करण्यास प्रतिबंध असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT