pune rajesh deshmukh 
पुणे

पुण्यात ग्रामीण भागात फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

सकाळ डिजिटल टीम

पुणे - लग्नासाठी कमाल ५० आणि अंत्यविधीसाठी २० व्यक्तींच्या उपस्थितीचा नियम हा केवळ शहरी भागांपुरताच मर्यादित नाही. हा नियम पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठीही लागू आहे. या आदेशानुसार ग्रामीण भागातही येत्या ३० एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्यामुळे ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायती आणि कटक मंडळाच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांनी या नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने राज्य सरकारने ६ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्णयाच्या आधारे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने याबाबत स्वतंत्र आदेश काढले आहेत. या दोन्ही महापालिकांच्या धर्तीवर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनीही ग्रामीण भागासाठी याबाबत स्वतंत्र आदेश काढला आहे.

ग्रामीण भागातील अत्यावश्‍यक सेवांची कार्यालये आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांचा अपवाद वगळता अन्य सर्व दुकाने, शाळा महाविद्यालये, मंगल कार्यालये, सलूनची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. यानुसार औषधी व किराणा दुकाने, दूध डेअरी, फळे, भाजीपाला आदींचीच दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. तसेच बांधकामांच्या ठिकाणी कामगारांची निवासी सोय असलेली बांधकामे सुरु ठेवावीत, अन्य बांधकामे बंद ठेवावीत, शेतीविषयक कामे आणि शेतीसाठी आवश्‍यक असलेली खासगी वाहने जसे ट्रॅक्टर, जेसीबी, माल वाहतूक सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कामगारांचे लसीकरण किंवा चाचणी अनिवार्य दरम्यान, उद्योग क्षेत्रात किंवा विविध दुकानांमध्ये काम करत असलेल्या सर्व कामगारांचे कोरोना लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे. ज्यांचे लसीकरण होणार नाही, अशा कामगारांनी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT