naval-kishore-ram
naval-kishore-ram 
पुणे

Coronavirus : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात अत्यावश्‍यक सेवाच सुरू राहणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्‍यक वगळता अन्य सर्व सेवा बंद ठेवण्याचे आदेश बुधवारी रात्री दिले. यानुसार सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही कारणाशिवाय येण्यास मनाई आहे. पुढील आदेशाईपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे.

कोरोनाचे रुग्ण पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात आढळून आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. गर्दीमुळे विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हे आदेश लागू केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात खासगी अथवा सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा जास्त  व्यक्ती एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

आज आणि उद्या अमृततुल्य बंद
पुणे - शहरातील अमृततुल्य गुरुवारी (ता. १९) आणि शुक्रवारी (ता. २०) बंद राहणार असल्याचे पुणे शहर अमृततुल्य व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित व्होरा यांनी बुधवारी कळविले.

कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी संघटनेने हा निर्णय घेतला आहे. शहरात आणि उपनगरांत सुमारे १३२० अमृततुल्य आहेत. सर्वजण या ‘बंद’मध्ये सहभागी होणार आहेत. संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाबाबत जागरूकता निर्माण करण्याचे आवाहनही संघटनेचे अध्यक्ष व्होरा, सचिव संजय ओझा आणि कार्याध्यक्ष केदार डांगे यांनी सदस्यांना केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT