Corona Vaccine 
पुणे

कोरोनाच्या संभाव्य लसीकरणासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी बाजारात येऊ घातलेल्या संभाव्य लसीकरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने बुधवारी (ता.2) जिल्हानिहाय जिल्हा कृती दलाची स्थापना केली आहे. संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हेच या कृती दलाचे अध्यक्ष असणार आहेत. या कृती दलाची पहिली बैठक येत्या 12 डिसेंबरपूर्वी घेण्यात येणार आहे. त्याबाबतचा आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून दर आठवड्याला या कृती दलाची बैठक होणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या आदेशानुसार पुणे जिल्हा कृती दलाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख असणार आहेत. अन्य सदस्यांमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे आदींसह जिल्हा क्रीडा अधिकारी, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, कॅटोंमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे सहआयुक्त, जिल्हा माहिती अधिकारी, कामगार सहआयुक्त आदींचा या कृती दलात समावेश करण्यात आला आहे.

या कृती दलाने आपापल्या जिल्ह्यातील कोरोनाच्या संभाव्य लसीकरणाचे नियोजन आणि व्यवस्थापन करावयाचे आहे. यानुसार जिल्ह्यासाठी आवश्‍यक लसींची संख्या, लस देण्याबाबतचा प्राधान्यक्रम आणि त्यासाठीचे तालुकानिहाय नियोजन हे कृती करणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार हे या दलाचे संयोजक असणार आहेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT