sakal 
पुणे

चार वर्षे उलटूनही वडार वाडीतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अपूर्णच

शंभर पेक्षा जास्त कुटूंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न चार वर्षांपासून प्रलंबित

समाधान काटे

शिवाजीनगर : झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठी वडारवाडी येथील प्लॅट नंबर ३३४ येथील रहिवाशांची घरे २०१७ मध्ये जमीनदोस्त केली, मात्र चार वर्षे उलटून देखील एकही स्लॅब न पडल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत.

वडारवाडी येथील शंभर पेक्षा जास्त कुटूंब मागील चार वर्षांपासून हक्काच्या घराच्या प्रतिक्षेत आहेत.झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठी रहिवाशांची घरे चार वर्षांपूर्वी जमीनदोस्त करण्यात आली. विकासकाकडून चार वर्षांपासून झोपडपट्टी धारकांना नाममात्र भाडे मिळते. प्रत्यक्ष मात्र सहा ते दहा हजार रूपये मोजून त्यांना भाड्याने राहावे लागते. यामुळे प्रत्येक महिन्याला चार ते पाच हजार अतिरिक्त भाड्याचा भुर्दंड रहिवाशांना बसतो.

कोरोना काळात अनेकांची नोकरी गेली, त्यामुळे घरखर्च कसा भागवायचा हा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. चार वर्षात एकही स्लॅब पूर्ण झाला नाही.कामाला होणाऱ्या दिरंगाईमुळे झोपडपट्टी धारकांनी विकासक बदलण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. तसेच स्थानिक रहिवासी दयानंद इरकल यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे विकासक बदलण्याची मागणी केली आहे. या संदर्भात लवकर खुलासा करावा असे पत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने विकासकाला दिले आहे.

"बरेच दिवस झाले काम थांबलेलं आहे.नवीन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार व टि.डी.आर च्या नियमानुसार त्याला चालना देता येईल.पाच वर्षे थांबलेत, नवीन नियमावली आता मंजूर झाली, त्यानुसार दिवाळीनंतर विकासकांच्या बैठका घेण्यास सुरुवात करणार आहे".

- राजेंद्र निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे.

"सदरील जागेमध्ये सार्वजनिक शौचालये तसेच झाड होते,ते पाडण्यासाठी प्रशासकीय परवानगी मिळण्यासाठी सुरवातीचे जवळपास सहा ते सात महिने लागले.शासनाचे नियम बदलणार होते.कोरोना काळात बांधकाम पूर्णपणे बंद होते.तो भाग सूक्ष्म प्रतिबंध क्षेत्र असल्याने बांबू लावून बंद करण्यात आला होता.येत्या दीड ते दोन वर्षांत बांधकाम पूर्ण करून घरे दिली जातील".

- निलेश खेडेकर,विकासक

नागरिकांच्या प्रतिक्रिया

"आमचं घर २०१७ मध्ये पाडलं.विकासकाकडून आम्हाला महिन्याला फक्त तीन हजार रूपये भाडे मिळते.सध्याच्या जमान्यात शिवाजीनगर,वडारवाडी भागात तीन हजार रुपयात घर भाड्याने मिळते का? आम्ही वडारवाडीत सात हजार रुपये भाडे भारून राहतो.चार वर्षात एकदाही भाडेवाढ करून मिळाली नाही.मुलींचा शिक्षणाचा खर्च, घरखर्च होत असल्याने बॅंकेत असलेले शिल्लक पैसे देखील खर्च झाले. जो विकासक लवकर घरे बांधून देईल त्याला प्रोजेक्ट करण्यासाठी द्यावा.या विकासकाने दिलेला शब्द पाळला नाही.पाठपुरावा करून देखील प्रतिसाद मिळत नाही".

- रूपाली चंद्रकांत बावधनकर,झोपडपट्टी धारक वडारवाडी.

"आम्ही सहा हजार घर भाडे भरतो, घरामध्ये तिघेजण राहतो.मुलगा कायम आजारी असल्याने त्याला वेगळी खोली लागते, मात्र भाड्याच्या घरात जागा कमी पडते,आर्थिक गणित जमत नाही.सध्या घरात पेन्शनवर उदरनिर्वाह चालतो.लवकर घरं तयार करून आम्हाला मिळावी".

- रुक्मिणी सकट,झोपडपट्टी धारक वडारवाडी.

"आमचं एक घर पाडलं.सध्या चार हजार भाडे देऊन राहतो. आजपर्यंत किमान निम्मे तरी काम झालं पाहिजे होतं. तेवढे देखील झाले नाही,भाडं परवडत नाही,भाडं वाढवून मिळावे , विकासकाने दोन वर्षेत काम करतो असे सांगून, चार वर्षे झाली. काम अजूनही रखडवले आहे.काम लवकर सुरू करावे".

- निता पवार झोपडपट्टी धारक वडारवाडी.

"सर्व झोपडपट्टी धारकांना करारनामा दिलेला नाही.

कोरोनाचा दोन वर्षाचा काळ सोडला तर दूसऱ्या दोन वर्षांत काम होयला पाहिजे होतं.विकासक सध्या जे भाडं देतो ते झोपडपट्टी धारकांना परवडणारे नाही हे अधिकाऱ्यांना समजायला हवं".

- दयानंद इरकल, स्थानिक रहिवासी.

बुलेट्स

  • शंभर पेक्षा जास्त कुटूंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न चार वर्षांपासून प्रलंबित

  • दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबद्दल नकारात्मक वातावरण.

  • प्रशासन व विकासकाकडे पाठपुरावा करून देखील प्रतिसाद मिळत नाही.

  • विकासक बदलून वेळेत काम पूर्ण करून देण्याची झोपडपट्टी धारकांची मागणी

  • विकासकाकडून मिळणारे भाडे नाममात्र असल्याने नागरिकांना अतिरिक्त भाडे देऊन राहवे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

Jungle Safari: वाघ-हत्तींच्या सफारीपलीकडे उत्तराखंडची नवी झेप; आता पर्यटकांना दाखवणार ‘हिमालयीन घोस्ट

डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' लालबागच्या राजाला अखेरचा निरोप; गर्दीच्या महासागरात शेवटचा दर्शनाचा क्षण

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT