KADUS 
पुणे

मंदिर बंद असले तरी या ग्रामस्थांनी अशी सांभाळली परंपरा...

महेंद्र शिंदे

कडूस (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश शिवमंदिरे दर्शनासाठी बंद असली, तरी श्रावणी सोमवारनिमित्त तांदळाची पिंड बनविण्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा खेड तालुक्यातील दोंदे येथील ग्रामस्थांनी अखंडितपणे सुरू ठेवली आहे. येथील दक्षिणेश्वर शिवमंदिरात पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त तांदळाच्या आकर्षक व कलात्मक पिंडी तयार करण्यात आल्या होत्या.

दोंदे येथे भीमा नदी काठावरील पुरातन दक्षिणेश्वर शिवमंदिरात दरवर्षी श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची दर्शनासाठी ये-जा असते. अभिषेक करण्यासाठी महिलांची विशेष गर्दी असते. दोंदे गावासह आजूबाजूच्या कडूस, रानमळा, वडगाव, पाडळी, पांगरी, चांडोली, गारगोटवाडी या गावांतील भाविक दर्शनाचा लाभ घेत असतात. या मंदिरात दर श्रावणी सोमवारी आकर्षक व कलात्मक तांदळाच्या पिंडी बनविल्या जातात. सुमारे दोनशे वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश शिवमंदिरे दर्शनासाठी बंद आहेत. दोंदे येथील दक्षिणेश्वर शिवमंदिर सुद्धा दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. अभिषेक करण्यासाठीसुद्धा बंदी केली आहे. परंतु, पूर्वापार सुरू असलेला तांदळाच्या पिंडी बनविण्याचा पायंडा ग्रामस्थांनी या वर्षी सुद्धा अखंडितपणे सुरू ठेवला आहे. 

याबाबत सरपंच स्वाती कोहिनकर व माजी सरपंच चंद्रकांत बारणे म्हणाले की, कोरोनाच्या संकटामुळे यंदा श्रींचे दर्शन आणि अभिषेक बंद ठेवला आहे. तांदळाच्या पिंडी बनविण्याची प्रथा सुमारे दोनशे वर्षांपासून सुरू आहे. जिल्ह्यातील मोजक्या शिवमंदिरात या पिंडी बनविल्या जातात. त्यात या मंदिराचा समावेश आहे. या परंपरेत खंड पडायला नको म्हणून ग्रामस्थांनी ठरवले. देवस्थानचे पुजारी सीताराम गुरव यांनी श्रींचा अभिषेक केला. परिसरात सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन केले जात आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT