Hospital-Bed 
पुणे

दिलासादायक! पुण्यात ऑक्‍सिजनची कमतरता असलेल्या प्रत्येक रुग्णाला मिळणार वेळेत उपचार

ज्ञानेश सावंत

पुणे - कोरोनाने बेजार झालेल्या अत्यवस्थ रुग्णांसाठी महापालिका आता नव्याने सुमारे सहाशे ऑक्‍सिजन बेड उभारणार आहे. विशेष म्हणजे, ऑक्‍सिजनचे उत्पादन करणाऱ्या पाच प्रमुख कंपन्यांसह वितरकांना एकत्र आणत महापालिका आणि खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्‍सिजनचा साठा केला जाणार आहे. त्यामुळे ऑक्‍सिजनची कमतरता असलेल्या प्रत्येक रुग्णाला वेळेत उपचार मिळणार आहेत. क्षेत्रातील कंपन्यांना पुरेशा सुविधाही पुरवून त्यांच्याकडून क्षमतेनुसार उत्पादन करून घेतले जाणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परिणामी, मृत्यूदरही कमी होण्याची आशा महापालिकेला आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच दुसरीकडे मात्र हॉस्पिटलमध्ये ‘व्हेंटिलेटर’ ‘आयसीयू’ आणि ऑक्‍सिजन बेड मिळत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे रुग्णांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. ही स्थिती आणखी बिघडण्याची भीती आरोग्य यंत्रणांना आहे. तेव्हा खबरदारी म्हणून व्हेंटिलेटर, आयसीयूसह आता ऑक्‍सिजन बेड वाढविण्यावर महापालिकेचा भर आहे. त्यासाठी मूळ ऑक्‍सिजनची निर्मिती वाढविण्यासाठी कार्यवाही केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून आयनॉक्‍स एअर प्रॉडक्‍टस (तीन कंपन्या), ‘टीनएस’ आणि क्‍लॉलिसर्ज सर्जिकल्स या कंपन्यांच्या प्रमुखांशी गुरुवारी चर्चा करण्यात आली असून, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आणि आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी उत्पादकांच्या अडचणी जाणून घेत, त्या सोडविण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे पुणेकरांना आता पुरेशा प्रमाणात ऑक्‍सिजन बेड उपलब्ध होणार आहेत. 

सिलिंडर खरेदी सुरू
महापालिकेच्या हद्दीत नव्याने सहाशे ऑक्‍सिजन बेड उभारण्यात येणार असून, त्यासाठी पहिल्या टप्प्यात दीडशे सिलिंडर खरेदी केले आहेत. उर्वरित सिलिंडर खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे. एवढ्या प्रमाणातील बेडसाठी उत्पादक कंपन्या आणि वितरकांना छोट्या-मोठ्या आकाराचे सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे सिलिंडर सहजरित्या भरता येतील, यासाठी जागाही पुरविण्यात येणार आहे. 

ऑक्‍सिजन बेडची मागणी असल्याने ही सुविधा वाढवत आहोत. त्यासाठी या क्षेत्रातील कंपन्यांना प्रोत्साहन देऊन, ऑक्‍सिजन निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी महापालिका आणि खासगी हॉस्पिटलमधील पायाभूत सुविधा वाढविण्यात येत आहेत. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना दिलासा मिळेल.  
- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

पुण्यातील स्थिती
१०, ६६४ - उपचार सुरु असलेले रुग्ण
२५०० - ऑक्‍सिजन बेड 
७०० - एकूण व्हेंटिलेटर
२५० - कोरोना रुग्णांसाठी

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

आजचे राशिभविष्य - 19 सप्टेंबर 2025

अग्रलेख : डिजिटल अरेस्ट

AFG vs SL Live : श्रीलंकेचा 'कुशल' विजय! अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात; बांगलादेशला लागली लॉटरी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT