court 
पुणे

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित; ३१ जुलैला होणार उच्च न्यायालयात सुनावणी

सकाळवृत्तसेवा

पुणे- अकृषी विद्यापीठाच्या परीक्षा राज्य सरकारने रद्द केल्या असल्या तरी वैद्यकीय परीक्षा घेतल्या जाणार होत्या. मात्र, राज्यातील कोरोनाची स्थिती पहाता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा स्थगित केल्या आहेत. दरम्यान, परीक्षा रद्द संदर्भात ३१ जुलै रोजी उच्च न्यायालयात सुनावणी आहे, त्यानंतर सर सविस्तर आदेश काढला जाईल असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. 

 उन्हाळी सत्रातील वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, नर्सिग, भौतिकोपचार आदी विद्या शाखांचे पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विद्यापीठाने यापूर्वी संकेतस्थळावर जाहिर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात येणार आहेत असल्याचे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अंतीम वर्षाच्या परीक्षेबाबत प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. परीक्षा घेण्यात येऊ नये या मागणीच्या दोन याचिका आणि पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या परीक्षा लवकर घेण्यात याव्यात या मागणीसाठी एक याचिका अशा एकूण तीन याचिका न्यायालयात आहेत. 
उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी ३१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्या निर्णयानंतरच सविस्तर आदेश काढण्यात येतील असे पाठक यांनी स्पष्ट केले आहे

दरम्यान, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वेळपत्रक जाहीर केले होते, त्यावरून टीका झाल्याने हा निर्णय मागे घेऊन परीक्षेच्या ४५ दिवस आधी वेळापत्रक जाहीर केले जाईल असे सांगितले होते. राज्यात कोरोनाची स्थिती पहाता परीक्षा घेणे अवघड होणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी तीन दिवसांपूर्वी  परीक्षा पुढे ढकल्याची सूचना कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना केली होती. त्यानंतर विद्यापीठाने याबाबत निर्णय घेतला आहे.तर पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी महाविद्यालयात रहात असल्याने त्यांच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार घ्याव्यात अशा सूचना देशमुख यांनी केल्या होत्या. 

अफवांवर विश्वास ठेऊ नका
आरोग्य शिक्षणातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व संबंधितांनी परीक्षेच्या संदर्भात कोणत्याही अफवा व खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. परीक्षेसंदर्भा कोणत्याही परिपत्रकाची खातरजमा करण्यासाठी विद्यापीठाचे www.muhs.ac.in संकेतस्थळावर भेट द्यावी असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा; २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT