पुणे

"सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र' स्पर्धेच्या ऑडिशन्सला सौंदर्यवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

सकाळवृत्तसेवा

पुणे - एक-एक तरुणी रॅम्पवॉक करत येत होती अन्‌ आपल्यातील कलागुण मुक्तपणे सादर करत होती. सौंदर्य, गुणवत्ता, लावण्य, धाडस आणि त्या जोडीला शालीनतेचे दर्शन पुण्यातील केंद्रावर दिसून आले. निमित्त होते "सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' स्पर्धेचे... 

महाराष्ट्रातील तरुणींच्या सौंदर्य आणि गुणवत्तेला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या "सकाळ माध्यम समूह' आणि "पु. ना. गाडगीळ आणि सन्स'तर्फे आयोजित या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला. पुणे केंद्रावरील ऑडिशन्सलाही अशीच जल्लोषात सुरवात झाली. सकाळी आठपासूनच ऑडिशन्ससाठी गर्दी झाली होती. पुण्यासह नगर आणि सातारा येथील तरुणी मोठ्या आत्मविश्‍वासाने रॅम्पवर आल्या. विशेष म्हणजे ग्रामीण भागात जिथे ब्यूटी पार्लरही नाही, अशा ठिकाणच्या तरुणींनी आत्मविश्‍वासाने रॅम्पवॉक केला. त्याचबरोबर काही तरुणींनी नृत्य, गाणे, कवितांसह विविध कलागुणांचे सादरीकरण केले. 

यापूर्वी ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, जळगाव येथे या स्पर्धेच्या ऑडिशन्स झाल्या. आज पुण्यामध्ये शेवटची फेरी पार पडली. यामध्ये निवडलेल्या स्पर्धकांचे ट्रेनिंग आणि ग्रुमिंग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. त्यामुळे सर्व केंद्रांतील सौंदर्यवती ग्रुमिंग आणि ट्रेनिंगला सुरवात करून अंतिम फेरीसाठी तयारीला लागल्या आहेत. ही फेरी 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 

फोटो फीचर पाहण्यासाठी क्लिक करा

तरुणींनी महाराष्ट्राची परंपरा जपली आहे. ग्रामीण भागापासून पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्येही सारखीच गुणवत्ता आहे. फक्त काही ठिकाणी त्याला वाव मिळायला संधी असते तर काही ठिकाणी नसते. "सकाळ'च्या पुढाकारामुळे ती संधी समान पातळीवर उपलब्ध झाली आहे. याचा जास्तीत जास्त तरुणींना फायदा होणार आहे. 
- लवेल प्रभू, फॅशन कोरिओग्राफर आणि टॅलेन्ट ग्रुमर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT