Billing from average meter reading in lockdown by MSEB 
पुणे

लॉकडाऊनमध्ये वाढल्या जादा विज बिल आकारणीच्या तक्रारी; हे आहे कारण?

अनिल सावळे

पुणे : लॉकडाऊन कालावधीत महावितरण कर्मचाऱ्यांकडून सरासरी मीटर रिडींग घेतले जात आहे. त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्या आणि इतर ग्राहकांना जादा बिल येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाऊनमुळे महावितरण कर्मचाऱ्यांना गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन मीटर रीडिंग घेणे शक्य होत नाही. शहरात एप्रिल आणि मे महिन्यात लॉकडाऊन असल्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष जाऊन मीटर रीडिंग घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्याची वीज बिले सरासरी बिलाच्या आधारित देण्यात आली. काही ग्राहकांना ऑनलाइन बिले पाठविण्यात आली. परंतु त्याबाबत अनेकांना माहितीच नाही. तर, काहींनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना एकत्रित बिल भरावे लागणार आहे. प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे पुन्हा वीज बिलाचा प्रश्न निर्माण झाला आहे.'महावितरण'कडून जादा दराने विज बिल आकारणी करण्यात आल्याची तक्रार काही गृहनिर्माण सोसायट्यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांकडे नुकतीच केली आहे. 

ट्रान्सफार्मरचे भाडे द्या : 
महावितरणने गृहनिर्माण सोसायट्यामध्ये ट्रान्सफार्मर बसविलेले आहेत. त्याचे भाडे महावितरणने सोसायट्यांना द्यावे, अशी नियमात तरतूद आहे. त्यानुसार गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत भाडे महावितरण'ने अदा करावे, अशी मागणी गृहनिर्माण सोसायट्यांनी केली आहे.

शिवछत्रपतींच्या आणखी एका सरदाराचे स्मारक सापडले; मरहट्टी इतिहास संशोधक मंडळाची कामगिरी

मिटर रिडींग घेण्यात चूक झाल्यास प्रत्यक्षात रीडिंग घेतल्यानंतर ही रक्कम महावितरणकडून परत केली जाते किंवा पुढील बिलात समायोजित केले जाते. 'महावितरण'ने सोसायट्यांना त्यांच्या जागेतील ट्रान्सफार्मरचे भाडे दिल्यास सोसायट्यांना खर्च भागविण्यास काही प्रमाणात मदत होईल.
- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच
 
महावितरणमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ''लॉकडाऊनमध्ये मार्च, एप्रिल आणि मेच्या बिलांमध्ये आपल्याला 31 मे पर्यंत व्याज किंवा दंडाची रक्कम लावण्यात आलेली नाही. जेव्हा ग्राहकांचे रिडींग घेणे शक्य नसते तेव्हा सरासरी बिल देण्याची सोय आहे. सरासरी बिल हे मागील तीन महिन्यांत झालेल्या रीडिंगच्या सरासरी वापराएवढे असते. बिलावरील रिडींग हे मिटरवरील रिडींगपेक्षा जास्त असल्यास वीज कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी. वीज दर नियामक आयोगाने एक एप्रिल 2020 पासून पाच वर्षांचे वीज दर निश्चित केले असून, त्यानुसारच आकारणी केली जाते. तसेच, ग्राहकांनी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन 'महावितरण'चे ॲप डाऊनलोड करून त्यावर मिटर रिडींगचा फोटो पाठवल्यास बिलाबाबत अडचण येणार नाही.

वीज बिलाची रक्कम कशी काढायची याबाबत सविस्तर माहितीसाठी लिंक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT