Pune News
Pune News esakal
पुणे

Pune | पुण्यातील भवानी पेठेत स्फोट, एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्यातील भवानी पेठेत आज संध्याकाळी स्फोट घडल्याची घटना घडली. या भागात असणाऱ्या विशाल सोसायटीमधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये हा स्फोट झाला. या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्फोटाच्या आवाजामुळे फ्लॅटच्या खिडक्या देखील फुटल्या. या घटनेची माहिती मिळताच पुणे (Pune) पोलिसांसह बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. रशाद मोहम्मद अली शेख असे या फ्लॅटधारकाचे नाव असून तो वॉशिंग मशीन, ओव्हन रीपेरींगचे कामे करतो. (Explosion In Bhavani Peth Of Pune, Before PM Modi Visit Incident Happened)

पोलिसांनी शेख यांना ताब्यात घेतले असून फ्लॅटमधून काही सीमकार्ड आणि पासपोर्ट देखील जप्त केल्याची माहिती मिळत आहे. प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट वॉशिंग मशीन रिपेअर करताना झाल्याचे समजत आहे. संशयित व्यक्तीकडे पोलिस कसून चौकशी करित आहेत. शेख हा गेल्या दहा वर्षांपासून या सोसायटीत वास्तव्यास आहे, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष मुस्ताक अहमद यांनी दिली.

राशद शेख हा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असून तो मूळचा मुंबईचा आहे. मात्र तो याच फ्लॅटमध्ये राहतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ निर्माण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT