admission
admission 
पुणे

पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ

सकाळवृत्तसेवा

पुणे - दहावी आणि बारावीनंतरच्या पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यत मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) दहावीनंतरच्या पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम; तसेच बारावीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी), हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान (हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्‍नॉलॉजी) सरफेस कोटींग टेक्‍नॉलॉजी, अशा पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. मात्र, सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी आणि पालकांना शाळांकडून शैक्षणिक कागदपत्रे; तसेच शासकीय कार्यालयांमधून दाखले मिळवण्यासाठी विलंब होत आहे. प्रवेश प्रक्रियेत राखीव प्रवर्गातून अर्ज भरण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे डीटीईने अर्ज सादर करण्यास मुदत वाढवून दिली आहे.

30 सप्टेंबरनंतर ई-स्क्रुटनीद्वारे किंवा प्रत्यक्ष स्क्रुटनीद्वारे नोंद होणारे, पडताळणी व निश्‍चित होणारे अर्ज संस्था स्तरावरील व कॅप व्यतिरिक्त जागांसाठीच विचारात घेतले जाणार आहेत. दरम्यान, तात्पुरती गुणवत्ता यादी 3 ऑक्‍टोबर रोजी, तर अंतिम गुणवत्ता यादी 8 ऑक्‍टोबर रोजी जाहीर होणार आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

पदविका प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक
- ऑनलाइन अर्ज करणे, कागदपत्रांच्या छायांकित प्रती अपलोड करणे : 30 सप्टेंबर
- कागदपत्रांची पडताळणी, अर्ज भरल्याची निश्‍चिती ((ई-स्क्रुटनी/ प्रत्यक्ष स्क्रुटनी) : 30 सप्टेंबर
- तात्पुरती गुणवत्ता यादी : 3 ऑक्‍टोबर
- यादीमध्ये तक्रार असल्यास त्या सादर करणे : 4 ते 6 ऑक्‍टोबर
- अंतिम गुणवत्ता यादी : 8 ऑक्‍टोबर

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT