Extension once again for filling up Pune University examination form
Extension once again for filling up Pune University examination form 
पुणे

विद्यार्थ्यांनो, 'या' तारखेपर्यंत भरा परीक्षेचा अर्ज; पुणे विद्यापीठाने पुन्हा एकदा दिली मुदतवाढ

ब्रिजमोहन पाटील

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्वच वर्षांच्या विद्यार्थांसाठी परीक्षा अर्ज भरण्यासाठी २५ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर, अंतर्गत मूल्यमापनाचे गुण विद्यापीठ वेब पोर्टलवर घेणेची अंतीम मुदत २७ जून पर्यंत वाढविण्यात आली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे म्हणाले, संगणकीय तांत्रिक अडचणीमुळे निर्माण झालेल्या अडचणीमुळे विद्यार्थीहित व इंटरनेटचा विचार करत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याशी चर्चा करून परीक्षा अर्ज भरणेची अंतीम मुदत २५ जून तर, अंतर्गत मूल्यमापनाचे गुण विद्यापीठ वेब पोर्टलवर घेणेची अंतीम मुदत २७ जून पर्यंत मुदतवाढ वाढविण्यात आली आहे. जे विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहिले होते, त्यांनी या काळात अर्ज भरावेत. 

दुबईतील दिर्हाम आले पुणेकरांच्या मदतीला; पाहा काय केलंय त्यांनी!

सहा महिने सुरू आहे अर्ज भरण्याची प्रक्रिया

१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या दरम्यान परीक्षा अर्ज भरून घेऊन पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मार्च महिन्यात सुरू झाल्या होत्या, काही अभ्यासक्रमाचे तीन ते चार पेपर झालेले आहेत. तरीही अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले नव्हते. कोरोना मुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या, त्यानंतर स्थिती गंभीर होत गेल्याने परीक्षा रद्दची मागणी समोर आली. अंतिम वर्ष वगळता इतर विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली, यानंतर अनेक विद्यार्थी आमचा परीक्षा अर्ज भरायचा अाहे, त्यासाठी संधी द्यावी अशी मागणी करू लागले। दरम्यान, लाॅकडाऊनच्या काळातही विद्यापीठाने आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा सुरू ठेवली होती. 

पोटातच बाळ मरण पावलेल्या महिलेसाठी अँब्यूलन्स चालक ठरला देवदूत  

अंतिम वर्षाची परीक्षा जुलै मध्ये होणार असे सांगितले गेल्याने पुन्हा १९ मे ते २८ मे परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदत दिली. ही मुदत वाढत जाऊन ११ जून पर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. तरीही इंजिनिअरींग व इतर शाखेच्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्या अशी मागणी केली. काहींनी व्यवस्थापन परिषद, अधिसभा सदस्यांच्या माध्यामातून  विद्यापीठावर दबाव आणून अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यायला लावली आहे, त्यामुळे आता २५ जून पर्यंत अर्ज भरता येणार आहे. जानेवारी ते जून असे सहा महिने परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदत दिल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे, असे सुत्रांनी सांगितले. 

- 'अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय...'; सरकारच्या निर्णयाबाबत विद्यार्थ्यांचं म्हणणं काय?

शिक्षण सोडून दिलेल्यांनी भरले अर्ज
२०१७ ला एकाने बीबीएला प्रवेश घेतला, पण पुढे परीक्षा दिलीच नाही. मात्र यंदा २०२० च्या परीक्षेचा अर्ज भरला आहे. राज्य सरकारने परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचे जाहीर केल्याने अशा प्रकारे शिक्षण सोडून दिलेल्यांनी परीक्षा अर्ज भरून वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रयत्न केला आहे, असे सुत्रांनी सांगितले. 
मात्र अंतर्गत मुल्यांकनावर विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार असल्याने असे विद्यार्थी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- लॉकडाऊन शिथील होताच आत्महत्यांच्या घटना वाढल्या; काय आहेत याची कारणे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : स्टार्क पाठोपाठ हैदराबादचं 'हेड'ही पडलं; वैभवनं दिला दुसरा धक्का

IPL Final, KKR vs SRH: 'सर्वोत्तम संघच...!', चेन्नईच्या मैदानात भिडण्यापूर्वीच कमिन्स-अय्यरमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध

Pune Porsche accident : पुणे अपघात प्रकरणात रॅप साँग करणारा आर्यन म्हणतो, मी मिडल क्लास असल्यामुळे...

Rajkot TRP Game Zone Fire: राजकोट गेमिंग झोन प्रकरणी कारवाईला वेग; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 2 अटकेत, 4जणांचा शोध

Shreyas Iyer : अय्यरची गिरकी तरी कमिन्सचीच सरशी! टॉसवेळी झाला वेगळाच ड्रामा

SCROLL FOR NEXT