Extension till May 10 for admission in RTE 25 percent reserved seats pune  sakal
पुणे

आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यत ५७ हजार ९९ प्रवेश निश्चित झाले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी आता १० मे २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे निवड यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्यासाठी आणखी कालावधी मिळाला आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यत ५७ हजार ९९ प्रवेश निश्चित झाले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची प्रक्रिया दरवर्षीप्रमाणे राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन सोडत (लॉटरी) ३० मार्च रोजी काढण्यात आली.

या सोडतीनुसार प्रवेशाच्या पोर्टलवर निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ४ एप्रिल रोजी घोषित केली. त्यात ९० हजार ६८८ विद्यार्थ्यांची निवड यादी तसेच ६९ हजार ८५९ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. तसेच या प्रवेश प्रक्रियेत दोनशे दिव्यांग विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड आणि प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांना एसएमएस पाठविण्यात आले आहेत. निवड यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी सुरवातीला २० एप्रिलपर्यत मुदत देण्यात आली होती, त्यानंतर २९ एप्रिलपर्यत मुदतवाढ देण्यात आली होती. आता या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ही अंतिम मुदतवाढ असणार आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.

आतापर्यत झालेल्या प्रवेशाचा आढावा :

जिल्हा : आरटीई शाळा : प्रवेशासाठी उपलब्ध जागा : आलेले अर्ज : निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या : निश्चित झालेले प्रवेश

औरंगाबाद : ५७५ : ४,३०१ : १७,२२१ : ४,१९३ : २,३९५

नागपूर : ६६३ : ६,१८६ : ३१,४११ : ६,१०६ : ३,९१८

नाशिक : ४२२ : ४,९२७ : १६,५६७ : ४,५१३ : २,९६५

पुणे : ९५७ : १५,१२६ : ६२,९६० : १४,९५८ : ९,७२८

रायगड : २६५ : ४,४६३ : ८,७७८ : ३,८१३ : २,१२७

ठाणे : ६४८ : १२,२६७ : २५,४१९ : १०,४२९ : ६,३५८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT