Mahavitaran 
पुणे

वीजबिलाचा तपशील ‘एसएमएस’द्वारे; महावितरणकडून सुविधा

सकाळवृत्तसेवा

पुणे - महावितरणच्या पुणे परिमंडळ अंतर्गत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर अशा एकूण ३० लाख १४ हजार ५६० (९६ टक्के) वीजग्राहकांनी ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकांची आतापर्यंत नोंदणी केली आहे. या सर्व ग्राहकांना वीजपुरवठा, वीजबिलांसह इतर विविध माहितीचा तपशील ‘एसएमएस’द्वारे देण्यात येत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी, तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक आदींची माहिती दरमहा ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे महावितरणकडून पाठविण्यात येत आहे. 

सध्या पुणे परिमंडलातील १ लाख २४ हजार ३५३ वीजग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली नाही. यामध्ये १ लाख ११ हजार ३५६ अकृषिक तसेच १२९९७ कृषी ग्राहकांचा समावेश आहे. ज्या ग्राहकांनी अद्यापही ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली नाही त्यांना महावितरणच्या ९९३०३९९३०३ या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून MREG(स्पेस) (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाइप करून ९९३०३९९३०३ क्रमांकावर ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. 

सर्वाधिक प्रतिसाद पिंपरी-भोसरीत

  • पुणे शहरातील महावितरणच्या कोथरूड, शिवाजीनगर, रास्ता पेठ, नगररोड, पद्मावती, पर्वती, बंडगार्डन या सात विभागांतर्गत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर असे १६ लाख ४ हजार ५६३ (९५ टक्के) ग्राहक
  • पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी व भोसरी या दोन विभागांतर्गत ६ लाख ७१ हजार ४५० (९७ टक्के) 
  • पुणे ग्रामीण मंडलमधील मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभागातील ७ लाख ३८ हजार ५४७ (९६.४५ टक्के)

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT