निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांना महाविकास आघाडी सरकारने पुन्हा नियुक्ती दिल्याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
फडणवीस म्हणाले, मनसुख हिरेन (Mansukh HIren) यांची हत्या संशयास्पद आहे. याप्रकरणी अनेक धागेदोरे हाती येत आहेत. NIAला सचिन वाझे यांच्याविरोधात अनेक पुरावे मिळाले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर अटकेची करवाई झाली आहे. वाझे यांच्यापुरतं हे प्रकरण मर्यादित नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर वाझे यांना सस्पेंड करण्यात आलं होतं. शिवसेनेच्या आग्रहानं त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा प्रयत्न झाला. कोरोनाचं कारण दाखवून त्यांना पुन्हा सेवेत घेतलं गेलं. दरम्यान, आपण काहीही करू शकतो, असं सरकारला वाटत असावं. असा टोलाही यावेळी फडणवीस यांनी सरकारला लगावला.
फडणवीसांनी उपस्थित केले प्रश्न
दरम्यान, पोलिसच गुन्ह्यांमध्ये सहभागी होत आहेत. पोलिसांच्या मदतीनेच एखाद्या व्यक्तीची हत्या होत असेल तर, हे असं का घडतंय? याचा विचार करायला हवा. एनआयएवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांनी आधी स्वतः विचार करायला हवा. पोलीस अधिकारीच असे कृत्य करत असतील तर, आम्ही राज्य खिळखिळं करतोय की हे घडवून आणणारे व्यक्ती राज्य खिळखिळ करत आहेत? वाझेंना सरकारनं परत सेवेत घेतलं? घेतलं तर, त्यांना एवढं महत्त्वाचं पद का दिलं? एपीआय दर्जाचे अधिकारी मुंबई इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख कसे होऊ शकतात? त्यावाचून काय अडलं होतं? असे अनेक प्रश्न यावेळी फडणवीस यांनी उपस्थित केले.
भाजपने राष्ट्रपती राजवटीची मागणी केली नाही
राज्यात भाजपने राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेली नाही. आमच्या नेत्यांनी फक्त इशारा दिला होता यासाठी त्यांनी इंदिरा गांधींच्या निर्णयाचा आधार घेतला असेल.
शरद पवारांना लगावला टोला
पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये आसाम वगळता इतर राज्यांमध्ये भाजपचा पराभव होणार असल्याचं भाकीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, "भारतीय जनता पक्ष हा एक नंबर पक्ष राहील. कुणी काहीही भाकीत केलं तरी काही फरक पडणार नाही."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.