failure to follow up for road near Chintamani School in Ambegaon  
पुणे

आंबेगावममधील चिंतामणी शाळेजवळ नागरिकांसाठी रस्ताच नाही; पाठपुराव्यालाही अपयश

अशोक गव्हाणे

कात्रज(पुणे) : आंबेगाव पठारावरील सोसायट्यांसाठी रस्ताच नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. गट क्रमांक 28/20, आंबेगाव पठार चिंतामणी ज्ञानपीठासमोरुन जाणारा रस्ता बंद केल्याने साई रेसिडेन्सी, साई तीर्थ, साई मँजेस्टीक, साई दर्शन, साई सिद्धी, श्री गणेश, दादाजी कॉम्प्लेक्स व वर्धमान विला या इमारतींना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असून त्यामुळे त्यांना चारचाकी गाडी सोसायटी परिसरात तर आणता येतच नाही. परंतु, दुचाकी घेऊन येणेही अवघड झाले आहे.

सोसायटीतून डावीकडे बाहेर पडल्यावर महापालिकेने टीडाआर दिला नाही या कारणास्तव खाजगी जागामालकाने रस्ता अडवला आहे. तर सोसायटीतून बाहेर पडून उजवीकडे जाणारा रस्त्याची महापालिका प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे दुरावस्था झाली आहे. तर, अनेक ठिकाणी रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी आलेले दिसते. यामुळे परिसरातील जवळजवळ पाचशे नागरिकांची गैरसोय होत आहे.

अकरावीच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी ७ हजार विद्यार्थ्यांची सहमती

सदर भागात पाण्याच्या पाईपलाईनचे कामही मागील १० महिन्यापासून अपुर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना नियमीत पाणी पुरवठा होत नाही. पाणीपुरवठ्याच्या अपुर्ण कामामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. रस्ता दोन्ही बाजूने अडवल्यामुळे खूप अडचणी निर्माण होत असून सदर रस्ता हा महापालिकेच्या निधीमधून करण्यात आला असून तो रस्ता जवळजवळ वीस वर्षे वापरात आहे. परंतु, काही लोकांच्या रस्ता अडवून ठेवल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांचे हाल होत आहेत. तसेच, अचानक एखादी आपत्ती उद्भवल्यास येथे रुग्णवाहिका, अग्निशमन, पोलिसमदत पोहचण्यास सुद्धा अडचण निर्माण होतील अशी स्थिती आहे.

रस्त्याच्या संदर्भात मोठी अडचण असून आम्ही महापालिकेकडे तोंडी व ६ वेळा लेखी तक्रार केली आहे. मागील ५ महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करुन ही महानगर पालिकेने याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. जर महानगर पालिकेस रस्ता, पाणी या दैनंदिन गरजेच्या कामाला वेळ लागणार असेल तर चालू वर्षाचा प्रॉपर्टी टॅक्स त्यांनी घेऊ नये
- विशाल भगत, स्थानिक नागरिक


त्या भागातील डाव्या बाजूची जागा महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही. जागामालकाचा टीडीआरचा विषय बाकी असल्या कारणाने अडचणी निर्माण होत असून हा विषय बांधकाम विभागाशी संबंधित आहे. तर दुसऱ्या बाजूनी पाणीपुरवठा विभाग काम करत असून लवकरच काम पूर्ण होईल
- के. एच. लाखानी, उपअभियंता, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी लग्न करतो म्हणाला, संबंध ठेवल्यानंतर नकार दिला; तीन वेळा अत्याचाराचे आरोप, नांदेडमध्ये भोंदू महाराजाला अटक

'अशोकमुळे ती लिंबू कलरची साडी फेमस झाली' अशी ही बनवाबनवी सिनेमाबद्दल बोलताना अश्विनी भावे म्हणाल्या...'सचिनचं ते स्त्री पात्र...'

Chhatrapati Sambhajinagar: सिंगल कनेक्शनलाही १० दिवस वेटिंग; एजन्सींवर पोलिस बंदोबस्त.

शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर ; या कलाकारांनी लावली हजेरी

Virat Kohli Fact Check: तीन दिवसाच्या अंतरात लंडनला चार्टर्ड फ्लाईटने फेरी... विराटने खरंच RCB कडे मागणी? स्वत: च पोस्ट करत केला खुलासा

SCROLL FOR NEXT