पुणे

पिंपरी : गॅस शेगडीत बिघाड असल्याचे भासवून पैसे उकळणारे दोघे ताब्यात (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : गॅस शेगडी तपासणीच्या नावाखाली ग्राहकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर वडगाव पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले.

या परिसरातील रहिवासी अभिजित मोरे, शिवाजी पवार, योगेश कुमार, राजेश मेमाणे, भीमराव मोरे, अविनाश ढोरे यांनी याप्रकरणी तक्रार दिली असून, या तक्रारीनंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले.  

गेल्या काही दिवसांपासून मावळ तालुक्यातील वडगाव शहर व परिसरात एचपी कंपनीचा गणवेश परिधान करून व कंपनीचे ओळखपत्र जवळ बाळगून काही मेकॅनिक गॅस शेगडीच्या तपासणीच्या नावाखाली फिरत आहेत. ते शेगडीचे व्हॉल्व्ह खराब झाल्याचे सांगून बाराशे ते पंधराशे रुपये उकळतात. 

या परिसरात काल (गुरुवार) हा प्रकार झाला. मोरे यांना शंका आल्याने त्यांनी अधिकृत गॅस शेगडी मेकॅनिकला बोलावून खात्री केली. त्यातूनच हा फसवणुकीचा प्रकार उघड झाला. त्यांनी दोघा जणांना पोलिसांच्या हवाली केले. काही मेकॅनिकांनी मात्र शहरातून पोबारा केला. 

सावधगिरी बाळगावी

घरी येणाऱ्या मेकॅनिकबाबत गॅस एजन्सीकडे चौकशी करूनच त्याला घरात प्रवेश द्यावा. अधिकृत सर्व्हिस सेंटरकडूनच शेगडीची तपासणी व दुरुस्ती करून घ्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

Lok Sabha Poll : शिवसेनेकडून सात नवे चेहरे रिंगणात; एकनाथ शिंदे यांची रणनीती; चार खासदारांचे तिकीट कापले

Ranveer Singh : रणवीरने सोशल मीडियावरून हटवले त्याच्या लग्नाचे फोटो ; चाहत्यांना बसला धक्का

Latest Marathi News Live Update : 'तीन टप्प्यांनंतर हे स्पष्ट झालंय की भाजपचा विजय रथ जनता पुढे नेतेय..' - पंतप्रधान मोदी

Lok Sabha Poll 2024 : जाळलेल्या ईव्हीएममधील ४१० मते सुरक्षित; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

SCROLL FOR NEXT