family crime registration cross 150 cases since three month police Sakal
पुणे

Pune News : कौटुंबिक अत्याचाराच्या घटना सुरूच...साडेतीन महिन्यांत दीडशेहून अधिक कौटुंबिक अत्याचाराचे गुन्हे

औंध परिसरातील तरुणीचे सप्टेंबर २०१५ला लोणावळ्यातील एका व्यावसायिकाशी लग्न झाले. त्यानंतर काही कालावधीने लग्नात मर्सिडीज गाडी दिली नाही...पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न लावून दिले नाही.

अनिल सावळे : सकाळ वृत्तसेवा

पुणे : औंध परिसरातील तरुणीचे सप्टेंबर २०१५ला लोणावळ्यातील एका व्यावसायिकाशी लग्न झाले. त्यानंतर काही कालावधीने लग्नात मर्सिडीज गाडी दिली नाही...पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न लावून दिले नाही.

माहेरहून पैसे घेऊन ये, नाहीतर घरातून निघून जा... आई-वडिलांनी काही शिकवलं नाही का? असे रोज टोमणे सुरू झाले. या सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने २२ मार्चला चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पती, सासू, सासऱ्याविरुध्द गुन्हा दाखल केला.

सगळीकडे ‘महिला सक्षमीकरणा’चे वारे वाहत असताना कधी दागिने, फ्लॅटसाठी माहेरहून पैसे आणले नाहीत तर कधी इतर कारणांसाठी महिलांचा सासरी होणारा छळ अद्याप थांबलेला नाही. कौटुंबिक अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत. मागील साडेतीन महिन्यांत दीडशेहून अधिक कौटुंबिक अत्याचाराचे गुन्हे पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आले आहेत.

कौटुंबिक अत्याचाराचे दाखल गुन्हे (एक एप्रिल ते १३ एप्रिल)

वाघोलीतील एका महिलेच्या सासरच्यांनी लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी तिचे दागिने काढून घेतले. माहेरातून वेळोवेळी १६ लाख रुपये घेतले. परंतु पतीकडून घटस्फोटासाठी दबाव टाकला जात आहे. पतीने प्रेयसीला घरी आणून ठेवण्याची धमकी देत असल्याची तक्रार विवाहितेने ९ एप्रिलला लोणीकंद पोलिस ठाण्यात दिली आहे.

भाग्योदयनगर, कोंढवा- लग्नात मानपान केला नाही. महागड्या वस्तू दिल्या नाहीत, असे वारंवार टोमणे, मारहाण. याबाबत डिसेंबर २०१८पासून सासरी छळ केला जात असल्याची ३२ वर्षीय महिलेची तक्रार. पती, सासू आणि नणंदे विरुद्ध गुन्हा दाखल.

मांजरी, हडपसर- येथील ३७ वर्षीय विवाहितेचा नवी मुंबईतील कोपर खैरणेत सासरी छळ. अनैसर्गिक अत्याचाराची तक्रार. बकोरी, लोणीकंद- येथील विवाहित महिलेचा नोव्हेंबर २०२०पासून घटस्फोटासाठी छळ

बिबवेवाडी- येथील २९ वर्षीय महिलेचा पिंपळे गुरव येथे सासरी मागील दोन वर्षांपासून छळ. माहेरी असताना लग्नापूर्वी घेतलेले कर्ज माहेरच्या लोकांनाच फेडण्यासाठी सांग. आम्हाला तुझ्या नावे गृहकर्ज घ्यायचे आहे, असे सांगून छळ.

भैरोबानाला, हडपसर- माहेरहून पैशांची मागणी आणि मुलगी झाली म्हणून महिलेचा छळ. विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

इंदिरानगर, औंध- लग्नात सोन्याची अंगठी दिली नाही. तू चांगली दिसत नाहीस असे टोमणे मारून हात फ्रॅक्चर केला. महिलेच्या तक्रारीवरून चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

वडगावशेरी- मित्राशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दारू पिऊन पतीकडून मारहाण. ४२ वर्षीय पत्नीने तक्रार दिल्यावरून येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

कोंढवा खुर्द- पैसे कमावू शकत नाही. नुसतीच जाड झाली आहेस असे टोमणे आणि चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण. ३६ वर्षीय महिलेची तक्रार.

सिंहगड रस्ता- पतीने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी दबाव टाकून मारहाण. ३० वर्षीय डॉक्टर महिलेची तक्रार.

पेरणे फाटा, लोणीकंद- बाळाला जन्म द्यायचा नाही, या कारणावरून विवाहितेचा छळ.

प्रतीकनगर, येरवडा - माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा.

महिलांवरील कौटुंबिक अत्याचारांच्या घटना-

वर्ष २०२३ - ५९३

१० एप्रिल २०२४ अखेर- १५२

कौटुंबिक अत्याचाराच्या घटनांमागे आर्थिक परिस्थिती जेमतेम असणे आणि अहंकार ही प्रमुख कारणे आहेत. महागाईच्या काळात एका व्यक्तीच्या पगारावर कुटुंब चालवणे अवघड आहे. त्यामुळे दोघांनीही नोकरी किंवा व्यवसाय करणे गरजेचे आहे.

घरात ज्येष्ठ कर्ता महिला-पुरुष असल्यास पती-पत्नीमध्ये वाद झाल्यास त्यांना समजावून सांगता येते. शिवाय, लहान मुलांना पाळणा घराऐवजी घरीच ठेवून कामावर गेल्यास काळजी राहत नाही. गुन्हा दाखल होण्यापूर्वी कौटुंबिक न्यायालयात समुपदेशनासाठी स्वतंत्र कक्षाची सुविधा आहे. दांपत्यांनी मुलांच्या भविष्याचाही विचार केला पाहिजे.

- ॲड. वैशाली चांदणे, अध्यक्ष, पुणे कौटुंबिक न्यायालय वकील संघटना.

महिला हेल्पलाइन क्रमांक १०९१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT