The family members of farmer have to work in the Farm due to lack of labor during lockdown.jpg 
पुणे

#Lockdown2.0 : ...म्हणून शेतकऱ्याचे कुटुंबच राबतेय शेतात

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शहराच्या लगत असणाऱ्या गावांमध्ये शेतीची कामे करण्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शेतामध्ये काम करावे लागत आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर याठिकाणी काम करणारे शेतमजूरांनी क्षणाचाही विलंब न करता थेट गाव गाठले. त्यामुळे शेतात तयार झालेले पिक कसे काढायचे, असा प्रश्‍न या परिसरातील शेतकऱ्यांसमोर उभा राहिला. त्यामुळे काही जणांनी कुटुंबातील सर्व सदस्यांनी साथी हाथ बढानाची भूमिका घेत शेतीचे काम करण्यास सुरुवात केली आहे. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बारा तास चालते काम.... 
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढू लागला आहे, त्यामुळे शेतातील कामाला सकाळी सहा वाजल्यापासूनच सुरुवात होते. दुपारी उन्हाचा कडाका वाढल्यानंतर कामाचा वेग कमी होतो. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत इथली कामे सुरु असतात. लॉकडाउन असल्यामुळे सरकारी यंत्रणांनी घराबाहेर न पडण्यास सांगितले आहे, त्यामुळे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक असणारी योग्य ती खबरदारी घेऊन ही मंडळी शेतात काम करुन शहरवासियांना भाजीपाल्याचा पुरवठा करत आहेत. 
दरम्यान, दीड महिन्यांपूर्वीच अनेक ठिकाणचे मजूर गावाला निघून गेले आहेत, त्यांना 300 रुपये रोज द्यायचो. आता काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हातात आलेले पिक जाउन आर्थिक नुकसान व्हायला नको, म्हणून सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेउन कुटुंब शेतामधील कामे पूर्ण करत असल्याचे चऱ्होली भागातील शेतकरी सतीश बुर्डे यांनी सांगितले. 

#Lockdown2.0 : निम्मे पिंपरी-चिंचवड सीलबंद
कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहाण्यासाठी शहरीभागाप्रमाणे गावांमध्ये देखील खबरदारी घेतली जात आहे, त्यामधे सोशल डिस्टन्सींग, तोंडाला मास्क लावणे, अशा उपायांचा समावेश आहे. 

या गावांमध्ये होते शेती.... 
रावेत, पुनावळे, किवळे, चऱ्होली, डुडुळगाव.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT