boar 
पुणे

भयंकर, शेतात काम करणाऱ्या कुटुंबावर रानडुक्करांच्या कळपाचा  हल्ला, चार जण... 

विजय जाधव

भोर (पुणे) : भोर तालुक्याच्या महुडे खो-यातील महुडे ब्रुद्रुक येथे शेतात काम करत असलेल्या कुटुंबावर रानडुक्कराच्या कळपाने हल्ला केला. या हल्यात एकाच कुटुंबातील चौघेजण जखमी झाले असून, बुधवारी (ता. २४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

या हल्ल्यात महुडे येथील शेतकरी जगन्नाथ दगडू पिलाणे (वय ४२), कमल जगन्नाथ पिलाणे (वय ३८), निता जगन्नाथ पिलाणे (वय 24) आणि अनिकेत जगन्नाथ पिलाणे (वय १६) हे जखमी झाले आहेत.

जगन्नाथ पिलाणे हे बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पत्नी कमल, मुलगी निता व मुलगा अनिकेत यांच्यासमवेत गावच्या खळदी नावाच्या परिसरातील आपल्या शेतात भुईमूग खुरपण्याचे काम करीत होते. त्यावेळी अचानक चार- पाच रानडुक्करांचा कळप तेथे आला. आणि त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांनी आरडाओरड केल्यावर शेजारच्या शेतात काम करीत असलेले शेतकरी धावत आले. तेव्हा रानडुक्करे पळून गेली.

जखमींना शेतक-यांनी लगेचच भोरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. चौघांच्याही शरीरावर अनेक जखमा झाल्या असून, त्यामधून रक्त मोठ्या प्रमाणात बाहेर येत होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. लिंगेश्वर बेरुळे यांनी त्वरित उपचार करून त्यांना धीर दिला. परंतु, अनिकेत पिलाणे या मुलाचे प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यास पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली. 

महुडे खो-यातील रानडुक्करे व इतर जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी महुडेच्या ग्रामस्थांनी केली. महुडे खो-यातील जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून जखमी झालेल्या शेतक-यांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रीया त्वरित सुरु करीत असल्याचे भोरचे वनरक्षक दत्तात्रेय मिसाळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण, चांदीही स्वस्त; तुमच्या शहरातील ताजा भाव जाणून घ्या

Satej Patil : आमदार सतेज पाटील यांची 'वाट' बिकट; नगरपालिकांच्या निकालाने बदलले समीकरण, काय असणार पुढची रणनीती?

Vidarbha Cold Wave: हिवाळा रंगात, थंडी जोरात; नागपूरचा पारा ८.२ अंशांवर, गोंदिया @ ८

WTC 2027 Final : न्यूझीलंडचा विजय अन् टीम इंडियाच्या फायनलचा मार्ग बंद; ऑस्ट्रेलियासोबत किवींची Point Table मध्ये मजबूत पकड

आजचे राशिभविष्य - 22 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT