Dr.Shashank-Samak 
पुणे

प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉ. शशांक सामक काळाच्या पडद्याआड; शेवटचे ट्विट चटका लावणारे!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ आणि क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट डॉ. शशांक सामक (वय 64) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी (ता.१५) त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.

डॉ. सामक यांना सकाळी छातीत दुखू लागले. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आहे. त्यात त्यांच्या हृदयाचे कार्य थांबले. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत संवेदनशील व्यक्तीमत्त्व अशी त्यांची ओळख होती.  

डॉ. सामक यांचे शालेय शिक्षण ज्ञानप्रबोधीनीत झाले. उच्च माध्यमिक शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालायातून केले. त्यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून 1977 साली त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी त्वचारोगाची पदविका अभ्यासक्रम पूर्ण केले. पण, त्यांनी क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून वैद्यकीय सेवा सुरू केली. ही वैद्यकीय शाखा सुपर स्पेशालिस्ट स्तरावर घेऊन जाण्यात डॉ. सामक यांचे मोठे योगदान आहे. `सेक्शुअल फिटनेस ` ही संकल्पना त्यांनी 1996 साली सर्वप्रथम मांडली. वैद्यकीय कामशास्त्र या संकल्पनेचे ते जनक होते. `चाळीशीनंतरचे कामजीवन` अशा प्रकारचे कार्यक्रमातून लैंगिकतेविषयी जनजागृती करत होते. 

दरम्यान, डॉ. सामक यांचे शेवटचे ट्विट चटका लावून जाणारे आहे. डॉक्टरांनी 12 मे रोजी शेवटचे ट्विट केले होते. त्यात कोरोना विषयी भाष्य करताना. Life is short, Death is sure, असा आशय होता. या ट्विटनंतर अवघ्या तीन दिवसांत त्यांनी जगाचा निरोप घेतल्यामुळं हे ट्विट चटका लावून जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! अंशत: अनुदानित शाळांवरील शिक्षकांचे १०० टक्के अनुदानित शाळेतील पूर्णवेळ शिक्षकांच्या जागेवर होणार समायोजन; आदेश नेमके काय? वाचा...

Indian girl in America: वडगावच्‍या नीलमची १४ महिन्यांची झुंज अखेर व्‍यर्थ; वडिलांचा हंबरडा...अपूर्ण राहिली भेट, अमेरिकेत नेमकं काय घडलं?

आजचे राशिभविष्य - 08 एप्रिल 2026

Daily Panchang 8 April 2026 : शुभ मुहूर्त, राहू काळ आणि दिनविशेष जाणून घ्या

Beetroot Rajma Pinwheels: सकाळी नाश्त्याला बनवा प्रोटिनयुक्त अन् चवीला मस्त ‘बीटरूट राजमा पिनव्हील्स’, लगेच नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT