NAR 
पुणे

शेतकऱ्याने लावला थेट काश्‍मीरला फोन आणि मिळवले लाखो रुपये 

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : जुन्नर तालुक्‍यातील हिवरेतर्फे नारायणगाव येथील शेतकरी अवधूत बारवे यांनी सुमारे 240 टन कलिंगडे श्रीनगर, जम्मू काश्‍मीर येथील बाजारपेठेत पाठवली. त्यामुळे या भागातील मुस्लिम बांधवांची लॉकडाउनमुळे रमझान सणानिमित्तच्या रोजासाठी निर्माण झालेली फळांची टंचाई निर्माण दूर झाली आहे. तसेच, बाजारपेठेअभावी कलिंगड पिकाचे बारवे यांचे होणारे लाखो रुपयांचे संभाव्य नुकसान टळले. 

प्रगतशील द्राक्ष उत्पादक बारवे यांनी द्राक्षाच्या रूट स्टॅक बागेत आंतरपीक म्हणून सात एकर क्षेत्रावर कलिंगड पिकाची लागवड केली होती. त्यासाठी त्यांना एकरी 50 हजार रुपये भांडवली खर्च झाला होता. मात्र, लॉकडाउनमुळे व्यापारी उपलब्ध नसल्याने तालुक्‍यातील बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मागील महिन्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बारवे हे चिंतेत होते. 

दरम्यान, रमझान सण सुरू झाल्याने व लॉकडाउन असल्याने श्रीनगर, जम्मू-काश्‍मीर भागात फळांची टंचाई असल्याची माहिती बारवे यांना समजली. त्यांनी जम्मू काश्‍मीर येथील व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. चांगल्या दर्जाची कलिंगडे असल्याने प्रतिकिलो साडेसात रुपये या दराने कलिंगडे खरेदी करण्याची तयारी व्यापाऱ्यांनी दर्शवली. मागील आठ दिवसांत जम्मू काश्‍मीर येथील व्यापाऱ्यांनी त्यांच्या शेतातून सुमारे दोनशे चाळीस टन कलिंगडे खरेदी केली. कलिंगड विक्रीतून बारवे यांना सुमारे अठरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. 

कोरोना संकटामुळे सर्व व्यवहार बंद असताना शेतकरी सर्व देश बांधवांसाठी अन्नपुरवठा करत आहे. या प्रतिकूल परिस्थितीत प्रथमच तालुक्‍यातून शेतकऱ्याच्या बांधावरून थेट जम्मू काश्‍मीरला कलिंगडे रवाना झाली आहेत. त्यामुळे माझे संभाव्य नुकसान टळले असून, रमझान सणानिमित्त रोजासाठी कलिंगडे पुरवठा करण्याची संधी मिळाली. याची नोंद स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अतुल बेनके यांनी घेतली आहे. 
- अवधूत बारवे, शेतकरी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT