farmers are in loss Grape beads burst due to unseasonal rains In pune 
पुणे

शेतकरी संकटात! अवकाळी पावसाने फुटले द्राक्षाचे मणी

राजकुमार थोरात

वालचंदनगर(पुणे) : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये झालेल्या २ मिमी अवकाळी पावसाने द्राक्षाचे मणी फुटण्यास सुरवात झाली आहे. व्यापाऱ्यांनी द्राक्षाची सौदे (खरेदी) बंद केली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.
 


इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील बोरी, भरणेवाडी, अंथुर्णे, लासुर्णे, शेळगाव, काझड, बिरंगुडी परीसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी अतिपावसाच्या संकटावर मात करीत द्राक्ष बागा फुलवल्या होत्या. सध्या पक्व झालेल्या द्राक्षांची तोडणी सुरु होती. अनेक शेतकऱ्यांच्या बागेतील द्राक्ष रशिया, मलेशिया थायलंड, चायना, श्रीलंका दुबईमध्ये निर्यात होत होती. निर्यातक्षम द्राक्षांना ११० ते १४० रुपयांचा दर मिळत होता. मात्र सोमवार (ता.५) रोजी दिवसा व रात्री अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. तसेच दिवस व रात्रभर ढगाळ वातावरण होते. पावसाचे पाणी द्राक्षाच्या घडावरती व घडामध्ये गेल्याने द्राक्षाचे मणी फुटण्यास होण्यास सुरवात झाली आहे. या परिसरातील सुमारे ३०० एकरापेक्षा जास्त द्राक्षाचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसानंतर व्यापाऱ्यांनी द्राक्षाचे सौदे करणे बंद केली असून द्राक्षाची तोडणीही बंद झाली आहे.

अवकाळी पावसाच्या हलक्या सरीमुळे शेतकऱ्यांना निर्यातक्षम द्राक्षे कमी दराने विकावी लागणार आहेत. तसेच पुढील आठ ते दहा दिवसामध्ये तोडणी होणाऱ्या बागांचे सर्वाधिक नुकसान होणार असून उन पडण्यास सुरवात होताचे द्राक्षाचे मणी फुटण्याचे  प्रमाण वाढत जाते.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

यासंदर्भात बोरीतील शेतकरी सहदेव शिंदे यांनी सांगितले अवकाळी पावसाच्या सरीमुळे द्राक्षाचे मणी फुटण्यास सुरवात झाली आहे. पंधरा दिवसांनी तोडणीस येणाऱ्या बागांचे सर्वाधिक नुकसान झाले असून शासनाने नुकसानग्रस्त बागांचे पंचनामे करण्याची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात गारठा वाढला, ७ जिल्ह्यांत थंडीच्या लाटेचा इशारा; तुमच्या जिल्ह्यांत कसे असेल हवामान? जाणून घ्या

UP Gangster Act : गांधींच्या फोटोवर गोळी आणि गोडसेचे गुणगान! महामंडलेश्वर पूजा पांडेवर UP पोलिसांनी का लावला 'गँगस्टर' कायदा ?

Nagpur Yuva Protest : ‘युवा कार्य’ च्या मोर्चात चेंगराचेंगरी; पोलिसांचा लाठीमार; २५ आंदोलनकर्ते जखमी!

Golden Bhelpuri House : आठ दशकांचा स्वाद वारसा; गोल्डन चटणीने मुंबईच्या भेळेला दिलं वेगळेपण

Coupe Car Body Style : स्टाइल, वेग आणि लक्झरीचं परफेक्ट मिश्रण; ‘कुपे’ मोटारींचा अद्वितीय प्रवास

SCROLL FOR NEXT