farmer1 
पुणे

 वृत्तवाहिनीविरोधात शेतकऱ्यांनी ठोकला शड्डू! 

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : टोमॅटो पिकावरील वनस्पतिजन्य विषाणूचा कोरोना विषाणूशी संदर्भ जोडून चुकीची व दिशाभूल करणारी अशास्त्रीय बातमी प्रसारित करून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान केल्याबद्दल संबंधित वृत्तवाहिनीवर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने शिवतेज फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक सतीश पाटे व विनायक मोरे यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात केली आहे. 

याबाबत पाटे व मोरे यांनी सांगितले की, जुन्नर व आंबेगाव तालुक्‍यातील टोमॅटोचा तोडणी हंगाम नुकताच सुरू झाला आहे. इतर भाजीपाला पिकाप्रमाणे मागील अनेक वर्षांपासून टोमॅटो पिकांवर जिवाणू व विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असतो, हे नैसर्गिक आहे. या वनस्पतिजन्य विषाणूचा व कोरोना विषाणूशी कोणताही सबंध नसताना एका वृत्तवाहिनीने चुकीची बातमी प्रसारित करून ग्राहकांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीची भावना निर्माण झाली आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याचा परिणाम झाल्याने टोमॅटोच्या मागणीत घट होऊन उत्पादक शेतकऱ्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. कोरोना व नैसर्गिक संकटामुळे अगोदरच शेतकरी अडचणीत असताना या वृत्तवाहिनीने चुकीचे वृत्त प्रसारित करून दिशाभूल केली आहे. त्यामुळे या वृत्तवाहिनीवर गुन्हा दाखल करून टोमॅटो उत्पादकांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. 

टोमॅटो पिकावरील वनस्पतिजन्य विषाणूचा कोरोना विषाणूशी संदर्भ जोडणे चुकीचे आहे.मागील वर्षी सुद्धा टोमॅटो पिकावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला होता.आज तालुक्‍यातील टोमॅटो फळांचे नमुने घेऊन तपासणीसाठी बंगलोर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. 
- सतीश शिरसाट
तालुका कृषी अधिकारी, जुन्नर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAE Visa Services: भारतीय प्रवाशांना अलर्ट! UAE मध्ये पासपोर्ट आणि व्हिसा सेवा बंद राहणार; जाणून घ्या नेमके कारण

Pune Grand Tour 2027 : पुणे ग्रँड टूर २०२७ अंतर्गत भोर–राजगड–मुळशीतील १७ रस्त्यांसाठी १९७ कोटींची मंजुरी; १३० किमी रस्ते डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार

Latest Marathi Live Updates: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी मुंबई विमानतळावर दाखल

विहिरीत उतरल्यावर समोर आली भूतकाळातील धक्कादायक रहस्ये! पाहा कसा आहे 'घबाड-कुंड' चित्रपट?

Mumbai Electricity: मुंबईत रिंग नेटवर्क उभारणार, १५ हजार कोटींचा खर्च; वीजपुरवठ्यासाठी टाटा पॉवरचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT