Farmers have started sowing rabi as the rains have stopped for the last few days 
पुणे

पावसाची उघडीप मिळाल्याने रब्बीच्या पेरण्यांना सुरुवात; शेतीच्या कामांना वेग

दिनेश टाकवे

करंजगाव : परतीच्या पावसाने गेल्या दहा दिवसांपासून घेतलेली उघडीप आणि पडणारी थंडी यामुळे नाणे मावळातील शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीला सुरुवात केली आहे. करंजगाव शेतकरी भाऊसाहेब मोरमारे, संजय टाकवे, शंकर गोडे म्हणाले, ज्वारी, बाजरी बरोबर वैरण म्हणून मका व निळवा पेरणीला प्राधान्य दिले जात आहे.
          
मावळात जूनच्या चक्रीवादळानंतर पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील भात लागवडीस उशीर झालेला आहे. परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने भात पिकाचे नुकसान झाले. मात्र परतीचा पाऊस रब्बीच्या पिकांसाठी फायदेशीर ठरेल असे नाणेचे शेतकरी नवनाथ नाणेकर, सागर नाणेकर, शेखर खोंडे, प्रकाश नाणेकर, यतिराज नाणेकर आदींनी सांगितले. या विचाराने रब्बी हंगामातील पेरणीला सुरुवात झाली आहे. शेतीच्या कामांना वेग आला आहे.

भात कापणी व पेरणी करावी लागत असल्याने शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने शेतकऱ्यांना कुटुंबासह स्वतःलाच अधिक राबावे लागत आहे. मसूर, हरभरा, वाटाणा व पावटा आदी पारंपरिक काठाणांच्या (कडधान्यांच्या) पेरणीनेही वेग धरला आहे.


संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT