Farmers Helpline for Drivers Delivery of Goods in city On behalf of the Agricultural Marketing Board 
पुणे

Lockdown : शेतमाल घरपोच देण्यासाठी वाहनमालकांसाठी किसान हेल्पलाईन 

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरामध्ये शेतमाल घरपोच देण्यासाठी छोट्या वाहन धारकांनी अथवा वाहनमालकांनी कृषी पणन मंडळाच्यावतीने किसान हेल्पलाईन क्रमांक 1800-233-0244 द्वारे आपली माहिती (उदा. वाहनचालकाचे नाव, वाहन क्रमांक, वाहनाचा प्रकार) नोंदवावी, अशी माहिती पणन संचालक सुनिल पवार यांनी दिली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ज्या शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट व शेतमाल पुरवठादार यांना अत्यावश्यक सेवा म्हणून शहरी भागात शेतमालाचा पुरवठा करण्यासाठी वाहनाची आवश्यकता असल्यास त्या वाहनाची माहिती कृषी पणन मंडळामार्फत दिली जाईल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासााठी येथे ►  क्लिक करा 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधक उपाययोजना सुरु असल्याने भाजीपाला वितरणासह इतर अत्यावश्यक सेवेचा पुरवठा शहरातील ग्राहक, विविध गृहनिर्माण सहकारी संस्थाना करण्यासाठी छोट्या वाहने (3 चाकी, 4 चाकी, पिकअप वाहन) यांची मागणी आहे. परंतु शेतकरी अथवा शेतमाल पुरवठादारांस बऱ्याच वेळा वाहन उपलब्ध होत नसल्याने शेतमाल शहरी भागात पुरवठा करण्यास विविध प्रकारच्या अडचणी येतात.

आणखी वाचा - हृदयविकार हेही आता कोरोनाचं लक्षण? हृदयविकाराच्या रुग्णांनी घ्या विशेष काळजी...

शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट व शेतमाल पुरवठादार यांनी शहरात आणलेला शेतीमाल गृहनिर्माण सहकारी संस्थेतील ग्राहकांना वितरीत करण्यासाठी वाहन उपलब्ध झाल्यास शेतमालाचा पुरवठा सुरळीत होऊ शकतो. यासाठी कृषी पणन मंडळ वाहतूक व्यवस्थेमध्ये समन्वयकाचे काम करीत आहे. वाहनचालक, मालक यांनी शहरी भागात शेतमालाचा पुरवठा करीत असताना त्यासाठी आवश्यक पासेस संबंधितांनी घ्यावेत. तसेच, वाहतूक खर्च हा शेतमाल पुरवठादार व वाहनचालक, मालक यांनी आपासात ठरवून घ्यावा, असे आवाहन पणन संचालक सुनिल पवार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake Cancer Medicines Racket : कॅन्सरच्या बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड; ९० हून अधिक रुग्णालयांना पुरवठ्याचा संशय

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर शिवेंद्रसिंहराजेंचा मोठा दावा; ‘तोंडाला पाने पुसणारे नव्हे, न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार’

Kundan Sankhe Arrested : पालघर रिलीफ रुग्णालय राडा प्रकरण; निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठ जणांची पोलिसांसमोर शरणागती, राहुल घरतसह 22 जणांना पोलिस कोठडी

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या पूजा आणि आरतीची वेळ, पाहा LIVE VIDEO

SCROLL FOR NEXT