Amol_Kolhe 
पुणे

अमोल कोल्हे यांच्यामुळे शेतकऱ्यांना मिळाले पाच कोटीचे अनुदान 

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरुर आदी तालुक्यांतील २ हजार ९५४ शेतकऱ्यांचे  कृषी विभागाच्या विविध योजनांचे सुमारे पाच कोटी रुपयांचे थकीत अनुदान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झाले. अनुदान रक्कम लाभधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे, अशी माहिती अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे यांनी दिली.

प्रायोगिक शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने राज्य शासन ठिबक सिंचन, ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, शेती मशागतीची इतर अवजारे खरेदीसाठी अनुदान दिले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सन २०१९/२० या कालावधीतील अनुदान प्रलंबित होते. निसर्ग चक्रीवादळ, कोरोना, अवेळी पाऊस आदी समस्यांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी थकीत अनुदान मिळावे, अशी मागणी खासदार डॉ. कोल्हे यांच्याकडे केली होती. याबाबत त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमल यांना निवेदन पाठवून पाठपुरावा केला. त्यामुळे अनुदान मंजूर झाले आहे.

बारामतीकरांसाठी मोठी बातमी, टोलबाबत राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
 
याबाबत डॉ. कोल्हे म्हणाले की, जुन्नर तालुक्यातील ठिबक सिंचन योजनेच्या ६५० लाभधारकांचे १ कोटी ५० लाख रुपये, यांत्रिकीकरण (एसटी संवर्ग) योजनेच्या ३५० लाभधारकांचे १ कोटी रुपये, आंबेगाव तालुक्यातील ठिबक सिंचन योजनेतील २५० लाभधारकांचे पन्नास लाख रुपये, खेड, शिरुर व इतर तालुक्यातील ठिबक सिंचन व यांत्रिकीकरण योजनेच्या एक हजार लाभधारकांचे दोन कोटी, असे एकूण पाच कोटी रुपयांचे इतके अनुदान प्रलंबित होते. हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उर्वरीत २ हजार ६४७ प्रस्तावातील ६ कोटी ५० लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी कृषी उपसंचालक, फलोत्पादन- ४, कृषी आयुक्तालय यांच्याकडे करण्यात आली आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सातत्याने नैसर्गिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा थकीत अनुदान मंजूर झाल्यामुळे मिळाला आहे.
 - डॉ. अमोल कोल्हे, खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT