Auto_Rickshaw 
पुणे

शेतकऱ्यांनंतर आता रिक्षाचालकांची बंदची हाक; सूर्योदय ते सूर्यास्त करणार उपोषण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रिक्षाचालकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (ता.15) येथील विधानभवनासमोर उपोषण करण्यात येणार आहे. सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत होणाऱ्या या उपोषणात रिक्षाचालकांचे विभागनिहाय प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या वेळी विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. 

कोरोनाच्या कालावधीत रिक्षाचालकांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून रिक्षा चालकांच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसून, विभागीय आयुक्तांनी यात लक्ष घालावे. रिक्षा चालकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नांविषयी पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ठोस निर्णय घ्यावेत. तसे निर्देश विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे. 

रिक्षा पंचायतीच्या एक ऑक्‍टोबरच्या रिक्षा बंद आणि निदर्शनांनंतर 5 ऑक्‍टोबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणाची बैठक झाली. मात्र, या बैठकीत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. बहुतेक स्थानिक पातळीवरील निर्णयही मार्गदर्शनासाठी राज्य सरकारकडे पाठवण्याचे बैठकीत ठरले. त्यानंतर अडीच महीने होत आले तरी या विषयी काहीही हालचाल नाही. स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेवून निर्णय घेण्यासाठी वाहतूक कायद्यानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणे स्थापित झाली आहेत. जर सर्व निर्णय राज्य सरकारच घेणार असेल तर ही प्राधिकरणे हवीतच कशाला? असा सवाल रिक्षा चालक संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Sri Lanka Test Series: भारत-श्रीलंका कसोटी मालिकेची तारीख जाहीर; WTC Final साठी दोन महत्त्वाचे सामने केव्हा व कुठे?

सायलीचं आहे खरी तन्वी, सुभेदारांसमोर येणार सगळ्यात मोठं सत्य, 'ठरलं तर मग'चा शेवट सुरू?

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेवर अंबादास दानवेंची टीका; "मृत्यूसाठी महापालिकाच जबाबदार"

VTU Result 2026: इतिहास घडला! परीक्षा संपताच अवघ्या ५ मिनिटांत 'व्हीटीयू'चा अभियांत्रिकीचा निकाल जाहीर; ६० हजार विद्यार्थ्यांना दिलासा

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

SCROLL FOR NEXT