pune fastag update 
पुणे

Fastag Update - खेड-शिवापूर टोल नाक्यावर दुपारनंतर गोंधळ

सकाळ डिजिटल टीम

खेड-शिवापूर - शंभर टक्के फास्टॅगद्वारे टोल वसुली अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशी खेड-शिवापूर टोल नाक्यावर दुपारपर्यंत फास्टॅग यंत्रणा सुरळीत सुरू होती. मात्र  दुपारनंतर दुप्पट टोल देताना प्रवासी आणि टोल कर्मचारी यांच्यात होणाऱ्या वादामुळे टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे प्रवाशांना फास्टॅग अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी मनस्ताप सहन करावा लागला. 

पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर मंगळवारी शंभर टक्के फास्टॅगद्वारे टोल वसुली सुरू करण्यात आली. खेड-शिवापूर टोल नाक्यावर पूर्वी स्थानिक नागरीकांना टोल फ्री सोडण्यात येत होते. त्यामुळे शंभर टक्के फास्टॅग टोलवसुली सुरू झाली तरी आम्ही टोल भरणार नाही, असा पवित्रा स्थानिक नागरिकांनी घेतला होता. तसेच खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीनेही स्थानिकांकडून टोल घेतल्यास आंदोलन करण्याचा ईशारा दिला होता. मात्र मंगळवारी खेड-शिवापूर टोल नाक्यावर स्थानिक नागरीकांना विना टोल सोडण्यात येत होते. तर इतर फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून मात्र दुप्पट टोल आकारणी करण्यात येत होती. 

दुपारपर्यंत टोल नाक्यावर फास्टॅग यंत्रणा सुरळीत सुरू होती. मात्र दुपारनंतर दुप्पट टोल देताना वाहन चालक आणि टोल कर्मचारी यांच्यामध्ये जागेवरच वाहने थांबवून वाद होत होते. त्यामुळे पाठीमागे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुण्याच्या बाजूला जाणाऱ्या टोल नाक्यावरील फास्टॅग मार्गिका आणि रोख स्वरूपातील मार्गिकेतही वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. 

"मुलाच्या परीक्षेसाठी सांगलीहून पुण्याला निघालो होतो. परंतु येथील टोल नाक्यावर वाहतुक कोंडीत आम्हाला अर्धा तास थांबावे लागले. याठिकाणी आमचा खूप वेळ वाया गेला." अशी प्रतिक्रिया प्रवासी कल्पना महाडिक यांनी व्यक्त केली.  

याबाबत पुणे-सातारा टोल रोडचे व्यवस्थापक अमित भाटीया म्हणाले, "फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल घेतला जात आहे. मात्र दुप्पट टोल देताना प्रवासी टोल कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहेत. त्यात वेळ वाया जात असल्याने टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Election Impact: थलपती विजयच्या राजकीय सुनामीचा ‘या’ कंपनीला फटका! दिवसभरात शेअर्स तब्बल 10% कोसळले

Assembly election results 2026 Live Update :भवानीपूरमध्ये राडा, मतमोजणी केंद्रात ममतादिदी अन् सुवेंदू अधिकारी दाखल

IPL 2026 : रोहित शर्माचा सराव सत्रात जोरदार फटका... ग्राऊंड्समन जखमी; त्यानंतर हिटमॅनची मन जिंकणारी कृती; मानला भावाला..

अभिनेते सुनील गोडबोले यांच्या भूमिकेतून मुलांना इतिहासाची प्रेरणा, उलगडला संभाजी महाराजांचा पराक्रम

PM Modi’s Favorite Jhalmuri: मोदींना आवडलेली झालमुरी कशी बनते ? बंगालच्या निवडणुकीत गाजलेल्या पदार्थाची रेसिपी लिहून घ्या, Viral

SCROLL FOR NEXT