dis.jpg
dis.jpg 
पुणे

ग्रामपंचायतींचा दिव्यांगांच्या हक्काच्या निधीवर डल्ला; पुण्यात उपोषण 

सकाळवृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दिव्यांगासाठी पाच टक्के निधी राखीव असूनही तो खर्च केला जात नाही. यापैकी निम्म्या निधीवर ग्रामपंचायतींकडून डल्ला मारला जात असल्याचा आरोप प्रहार दिव्यांग कल्याण आंदोलन या संघटनेने केला आहे. हा हक्काचा निधी त्वरीत मिळावा, या मागणीसाठी संघटनेच्यावतीने मंगळवारी (ता.११) जिल्हा परिषद मुख्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दिव्यांगासाठी राखीव असलेला सर्व निधी दिव्यागांच्या वैयक्तिक लाभासाठी खर्च  केला जाईल, यासाठी ग्रामपंचायतींना आदेश दिला जाईल. येत्या १५ दिवसांत हा निधी दिव्यांगांसाठीच वापरला जाईल, असे आश्र्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिले. प्रसाद यांच्या आश्वासनानंतर हे लाक्षणिक उपोषण सोडण्यात आले. 

प्रहार दिव्यांग कल्याण आंदोलन संघटनेचे पश्र्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली दत्तात्रेय ननवरे, सुप्रिया लोखंडे, साहेबराव जगताप, नंदू पोळेकर आदींनी हे उपोषण केले. यामध्ये सुरेखा ढवळे, राजेंद्र खाकाळ, 
अनिता कांबळे, रोहित भोसले, पृथ्वीराज म्हस्के आदी सहभागी झाले होते. 

दरम्यान, सिईओ आयुष प्रसाद यांच्या आश्वासनानंतर प्रसाद यांच्या हस्ते सर्व उपोषणकर्त्यांना कॅडबरी चॉकलेट देऊन उपोषण सोडण्यात आले. 

प्रत्येक ग्रामपंचायतीने एकूण  स्वउत्पन्नातील पाच टक्के निधी दिव्यांग कल्याणासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. तरीही तो खर्च केला जात नाही. अजूनही जिल्हा परिषदेने दिलेल्या आश्वासनाची पुर्तता न झाल्यास आंदोलन केले जाईल.-सुप्रिया लोखंडे, उपोषणार्थी.

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या आश्वासनानंतर आम्ही उपोषण मागे घेतले आहे. मात्र या आश्वासनांची पुर्तता व्हावी, हीच अपेक्षा आहे. -दत्तात्रेय ननवरे
उपोषणार्थी

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

Planet Nine : नेपच्यूनच्या पलीकडे असू शकतो आणखी एक ग्रह; आतापर्यंत राहिला होता लपून.. शास्त्रज्ञांना मिळाले नवे पुरावे!

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

SCROLL FOR NEXT