Fatal attack on 7 Year old girl for reporting playing cards near public toilet  
पुणे

....म्हणून सात वर्षांच्या मुलीवर चाकूने वार; वानवडी पोलिसांकडून तिघांना अटक

सकाळवृत्तसेवा

पुणे: वस्तीमधील सार्वजनिक शौचालयाजवळ पत्ते खेळणाऱ्यांबाबत पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून सराईत गुन्हेगारांनी साथीदारांच्या मदतीने कुटुंबावर चाकूने हल्ला केला. सात वर्षाच्या मुलीवरही चाकूने वार केल्यामुळे मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हा धक्कादायक प्रकार रविवारी दुपारी चार वाजता रामटेकडी येथे घडला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

करण सुंदरलाल वाल्मिकी (वय 20), पापा वाघेला (वय 19) आणि साहिल र्फ लड्डू वाघेला (वय 19, सर्व रा. रामटेकडी , हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बेबी सूरज पाटोळे (वय 40) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बेबी पाटोळे या त्यांच्या कुटुंबासह रामटेकडी परिसरात राहतात. वस्ती असल्यामुळे सार्वजनिक शौचालयाचा नागरिकांकडून वापर केला जातो. दरम्यान, संबंधीत सार्वजनिक शौचालयासमोरच आरोपी करण वाल्मिकी व त्याचे साथीदार पत्ते खेळत होते.

Video : खासदार अमोल कोल्हेंनी काढले केंद्र सरकारचे वाभाडे; लोकसभेतील भाषण व्हायरल 

दरम्यान, फिर्यादी यांच्या भावाची सात वर्षांची मुलगी त्यांच्याघरी खेळण्यासाठी आली होती. त्याचवेळी आरोपी सार्वजनिक शौचालयासमोर पत्ते खेळत होते. त्यामुळे फिर्यादी व त्यांचे पती सुरज पाटोळे यांनी आरोपींना शौचालयासमोर पत्ते खेळू नयेत, असे सांगितले. त्यामुळे त्यांच्यात वाद वाढल्याने आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादी या आरोपींविरुद्ध पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. पोलिसात तक्रार देण्यासाठी गेल्याने आरोपींना राग आला. त्यामुळे आरोपींनी रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरी येऊन त्यांना व त्यांच्या पतीला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच सुरज पाटोळे यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यानंतर करणने हातातील चाकूने सुरजवर वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीच्या भावाची सात वर्षांची मुलगी तेथे होती. सुरजने त्याच्यावर होणारा चाकूचा वार चुकविला. त्यामुळे चाकूचा वार फिर्यादीच्या भावाच्या मुलीवर बसला. त्यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Issue : पुण्यातील पाणीकपात वाढविण्याची गरज नाही; सजग नागरिक मंचाची मागणी

Pune News : दुष्काळात ज्वारीच्या बियाण्यांचे पाठबळ! पावसावर लागवडीचे क्षेत्र ठरणार; शेतकऱ्यांना मिनीकिटचे वाटप

Maharashtra Live News: गोर बंजारा आरक्षणाचा प्रश्न अधिवेशनात मांडण्याची मागणी

Pune Crime : बनावट नोटा बनवणारी टोळी गजाआड; पाच लाख ६४ हजारांच्या नोटा जप्त

भारत-नेदरलॅंड्स व्यापार दुप्पट होणार; डच परराष्ट्र व्यापारमंत्री स्जूर्ड्समा यांची अपेक्षा

SCROLL FOR NEXT