Fatal attack on boy who as asked to return stolen mobile 
पुणे

धक्कादायक! चोरीचा मोबाईल परत करण्यास सांगितले म्हणून तरुणावर कोयत्याने वार

सकाळवृत्तसेवा

पुणे : चोरलेला मोबाईल पोलिस ठाण्यात जमा करण्यास सांगितल्याच्या रागातून दोघांनी तरुणावर कोयत्याने वार करीत त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी रात्री नऊ वाजता बिबवेवाडी येथे घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सौरभ राजू भगत (वय 21, रा. मोरे वस्ती, सहकारनगर), अजय जवाहर प्रजापती (वय 20, रा. सुखसागर नगर, साईनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहे. याप्रकरणी सूरज कामथे (वय 29, रा.धनकवडी) याने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कामथे व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. कामथेने त्याच्या मोबाईलचे सिमकार्ड आरोपी भगत याला दिले होते. त्यानंतर भगतने ते सिमकार्ड त्याच्याकडील मोबाईलमध्ये टाकले, त्याचा एक दिवस वापर करून दुसऱ्या दिवशी तेच सिमकार्ड फिर्यादी माघारी दिले. फिर्यादीने ते सिमकार्ड स्वतःच्या मोबाईलमध्ये टाकल्यानंतर त्यांना ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलिस ठाण्यातून फोन आला.

फिर्यादी यांनी अगोदर वापरलेला मोबाईल चोरीचा असून तो मोबाईल तत्काळ राजगड पोलिस ठाण्यात जमा करावा, असे त्यास पोलिसांनी बजावले. त्यामुळे फिर्यादी हा प्रकार भगत यास सांगण्यासाठी त्याच्या घरी गेला, त्याचा राग आल्याने भगत व प्रजापती या दोघांनी फिर्यादी शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्याकडील धारदार शस्त्राने फिर्यादीच्या तोंडावर व मानेवर वार केले. तर दुसऱ्याने चाकूने छातीवर उजव्या बाजूला व पाठीवर वार करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानंतर आरोपींनी स्थानिक नागरिकांना शिवीगाळ करीत नागरिकांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी संबंधित ठिकाणी दहशत निर्माण केल्याने लोक घाबरून पळू लागले, त्याचबरोबर दुकानदारांनीही त्यांची दुकाने बंद केली.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना टाकला मोठा डाव! , आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत दिसणार 'हा' पक्ष!

मुलगी झाली हो...! कियारा आणि सिद्धार्थ झाले आई-बाबा, मल्होत्रा कुटुंबात चिमुकल्या पाहुणीचं आगमन!

heart-stopping footage : Video काळजाचा थरकाप उडवणारा! 'तो' ट्रॅकवर निपचित राहिला पडून अन् वरून धावती रेल्वे

आता ट्रेनच्या जनरल कोचमध्ये फक्त १५० प्रवाशांना तिकिटे मिळणार! रेल्वे मंत्रालय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Tesla Car Booking Offer: बंपर ऑफर...! आता फक्त २२ हजारांत बुक करता येणार 'टेस्ला'ची अलिशान कार, मात्र...

SCROLL FOR NEXT