beaten 
पुणे

घराभोवती घुटमळल्याचा जाब विचारल्याच्या राग; कुटुंबातील 5 जणांवर जीवघेणा हल्ला

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे- रात्रीच्यावेळी घराभोवती घुटमळणाऱ्या तरुणांना जाब विचारल्याच्या रागातून दोघांनी एकाच कुटुंबातील पाच जणांवर जीवघेणा हल्ला केला. त्यामध्ये एका नागरिकाच्या डोक्‍यात धारदार जाड काचेने वार केले, तर 12 वर्षाच्या मुलाला उचलून जमिनीवर आपटत त्यास गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी सायंकाळी साडे सात वाजता विश्रांतवाडी येथे घडली. 

प्रमोद ऊर्फ मुन्ना कांतिलाल गायकवाड (वय 20, रा. भीमनगर, धानोरी, विश्रांतवाडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर त्याचा दुसरा साथीदार पळून गेला. याप्रकरणी रमाकांत साळवी (व 40, रा. धानोरी रोड, विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक लहू सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे धानोरी रोड येथील पत्र्याची चाळ परिसरात राहतात. रविवारी सायंकाळी त्यांच्या घराभोवती आरोपी गायकवाड व त्याचा साथीदार बराच वेळ घुटमळत होते. त्यामुळे फिर्यादीच्या कुटुंबातील महिलांनी त्यांना तेथे फिरण्याचा जाब विचारला. त्यावेळी अंगणात झोपलेले फिर्यादीचे नातेवाईक राजेश काकडे यांची आरोपीसमवेत बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करीत त्यांना मारहाण केली. 

भाजपचं सरकार असलेल्या राज्यात 'लव्ह जिहाद' विरोधी कायदा; वाचा काय...

आरोपीने त्याच्या हातातील जाड धारदार काचेने फिर्यादीच्या डोक्‍यात वार करीत त्यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपी फिर्यादीला कोयत्याने मारण्यास जात असतानाच फिर्यादीची आई सीताबाई यांनी त्यास अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने सीताबाईच्या हातावर कोयत्याने वार करून त्यांनाही जखमी केले. त्याचवेळी तेथे थांबलेल्या फिर्यादीच्या 12 वर्षाच्या पुतण्याला उचलून जमिनीवर जोरात आपटले. त्यामुळे फिर्यादीच्या पुतण्याच्या हाताला जबर दुखापत झाली. या घटनेनंतर आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर विश्रांतवाडी पोलिसांनी प्रमोद गायकवाड यास तत्काळ अटक केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

SCROLL FOR NEXT