father and daughter killed in accident pune solapur highway patas
father and daughter killed in accident pune solapur highway patas sakal
पुणे

पुणे : पाटस अपघातात बापलेकीचा मृत्यू

अमर परदेशी

पाटस : पुणे सोलापुर महामार्गावर पाटस (ता.दौंड) हद्दीत विरुध्द दिशेने भरधाव वेगात येणाऱया टेंपोची दुचाकीला धडक बसुन भीषण अपघात झाला.यामध्ये दुचाकीवरील बापलेकीचा जागीच मृत्यू झाला.तर आइ गंभीर जखमी झाल्याची दुदैवी घटना घडली. अतुल सिगारेट काळे (वय ३०) व इंद्रायणी काळे (वय दिड वर्षे) असे मयत झालेल्यांची नावे आहेत.तर जयश्री काळे ही महीला गंभीर जखमी झाली आहे. याबाबत सुकेश काळे (रा.पाटस ता.दौंड) यांनी पाटस पोलिसात फिर्याद दिली.त्यानुसार पोलिस नाइक अजित इंगवले यांनी माहीती दिली.

पाटस येथील अतुल काळे हा पत्नी जयश्री व मुलगी इंद्रायणी काळे यांना घेवून रविवारी (ता.२६) दुपारी दुचाकीवरुन महामार्गाने वरवंडकडे जात होता.ढमालेवस्ती भागात विरुध्द दिशेने भरधाव वेगात टेंपो येत होता.त्यावेळी टेंपो व दुचाकीची समोरासमोर धडक झाली.हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील अतुल व त्याची कन्या इंद्रायणी यांचा जागीच मृत्यू झाला.तर जयश्री काळे या गंभीर जखमी झाल्या.परीसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली.माहीती मिळताच यवत पोलिस ठाण्यातील पोलिस नाइक अजित इंगवले,रमेश चव्हाण यांनी संबधीत ठिकाणी हजेरी लावली.मृतदेह विच्छेदनासाठी पाठवुन दिले.

दरम्यान,संबधीत टेंपो चालक हा बेजबाबदारपणे विरुध्द दिशेने आल्याने हा अपघात झाल्याचे संबधीत मयत व्यक्तीच्या नातेवाइकांनी सांगितले. दरम्यान,फिर्यादी वरुन संबधीत टेंपो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन अपघातग्रस्त टेंपो ताब्यात घेण्यात आला आहे.अशी माहीती पोलिस नाइक इंगवले यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT