Crime- 
पुणे

मुलाकडून बेदम झालेल्या मारहाणीत वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू

मनोज कुंभार

वेल्हे, (पुणे) - किरकोळ भांडणातून मुलाकडून झालेल्या मारहाणीमध्ये वडिलांना दुखापत झाली यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला, मारहाणीची घटना वेल्हे तालुक्यातील खोपडेवाडी गावात घडली आहे. रमेश विठ्ठल जोरकर (वय, ५५) असे मयत झालेल्या व्यक्ती चे नाव असून या प्रकरणी मुलगा प्रकाश रमेश जोरकर (वय - २९) यास वेल्हे पोलीसांनी अटक केली. याबाबत मयत व्यक्तीची पत्नी संगीता जोरकर यांनी पोलिसात फिर्याद दिली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ च्या दरम्यान आरोपी प्रकाश जोरकर हा त्याच्या मित्रांसोबत त्याच्या राहत्या घरी खोपडेवाडी येथे आला असता जेवणाची ताटे घरा बाहेर घेऊन येण्याची मागणी त्याची पत्नी शकुंतला हिला सांगितले परंतु वडिलांनी तो कोण काय जहागीरदार आहे का, येईल आत मध्ये असे म्हणण्यावरून वाद झाल्याने रमेश विठ्ठल जोरकर यास सख्ख्या मुलाने बापाला लाथाबुक्क्यांनी बेदम केली.

आरोपी ची सावत्र आई संगीता जोरकर व पत्नी शकुंतला ही भांडणे सोडवण्यास आल्या असता त्यांना न जुमानता वडिलांना  काठीने,लाथा बुक्क्यांनी  बेदम मारहाण केली या बेदम मारहाणीत त्यांना दुखापत झाली यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार चालू होते उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात आज (ता.२९) रोजी दुपारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT