pune sakal
पुणे

निर्माण व्यसनमुक्ती व मानसोपचार केंद्रात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी

महात्मा गांधीजींच्या विचारप्रेरणेतून निर्माणची स्थापना करण्याची प्रेरणा मिळाली.

तेजस भागवत

विश्रांतवाडी : लोहगाव येथील निर्माण व्यसनमुक्ती व मानसोपचार केंद्रात महात्मा गांधी जयंती, निर्माण संस्थेचा सातवा वर्धापन दिवस व जागतिक मानसिक आरोग्य दिन असा तिहेरी कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. यावेळी निर्माणचे संस्थापक साहेबराव दराडे यांनी महात्मा गांधीजींच्या विचारप्रेरणेतून निर्माणची स्थापना करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. डॉ भालचंद्र काळमेघ यांनी जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त 3ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत विनामूल्य व्यसनरूग्ण व मानसिकरुग्ण यांची बाह्य रुग्ण तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

त्यानिमित्त 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरमधील सोमवार, बुधवार व शुक्रवार यादिवशी दुपारी दोन ते पाच या वेळेत रुग्णांची तपासणी करण्यात येईल. यावेळी प्रा. विलास गरुड, सुभेदार प्रकाश नवले, सुभेदार मेजर पी. एस. पाटील, कल्पेश कुलकर्णी, मैथिली मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी रुग्णमित्रांनी "इतनी शक्ती हमें देना दाता" हे प्रेरणा भक्तिगीत सादर केले. कार्यक्रमाचे आभार पूजा जोशी यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा प्रकाश दळवी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Republic Day : महाराष्ट्राच्या चित्ररथावर ‘गणेशोत्सवा’चा देखावा; प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर घुमणार ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष

Gold Rate Today : सोनं स्वस्त की महाग? पाहा तुमच्या शहरातील आजचा सोनं-चांदीचा ताजा भाव

Central Railway Special Train: प्रवासाचा प्लॅन ठरवण्याआधी वाचा! मुंबईहून कोकणात-नागपूर जाण्यासाठी विशेष गाड्या, संपूर्ण वेळापत्रक इथे पाहा

‘महाराजा’चा सीक्वेल येणार? विजय सेतुपतीचा वेगळा अंदाज पहायला मिळणार?

Satara Politics : 'साताऱ्यात दोन्ही राष्‍ट्रवादी एकत्रित निवडणूक लढणार, काही ठिकाणी काँग्रेसही राहणार सोबत'; NCP नेत्याची माहिती

SCROLL FOR NEXT