ferguson-University
ferguson-University 
पुणे

#FCPune फर्ग्युसन विद्यापीठ झाल्याचा सार्थ अभिमान

सकाळवृत्तसेवा

पुणे - माझे फर्ग्युसन महाविद्यालय आता विद्यापीठ झाले. आम्हा सर्वांना याचा खूप अभिमान आहे, महाविद्यालयाचे विद्यापीठात रूपांतर होणार ही खरोखरच उत्तम आणि आनंद साजरा करण्याची गोष्ट आहे. ही केवळ कौतुकास्पद नव्हे तर अभिमानास्पद बाब असल्याची भावना या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आज व्यक्‍त केली. 

फर्ग्युसन महाविद्यालयाचे स्वायत्त विद्यापीठ झाले. यानिमित्त महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी त्यांच्या भावना ‘सकाळ’च्या माध्यमातून व्यक्त करत महाविद्यालयाला शुभेच्छा दिल्या.

फर्ग्युसन महाविद्यालय आता विद्यापीठ होणार याचा मला खूप आनंद वाटत आहे. माझी मुलगी या महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. येथील शिक्षण पद्धती, उपक्रम, शिस्त चांगली होती. ज्यामुळे माझी मुलगी चांगल्या गुणांनी पास होऊन इंजिनिअर झाली आहे.’’  
- विद्याधर रानडे, पालक 

 महाविद्यालय आता विद्यापीठ होणार ही आनंदाची बाब आहे. या महाविद्यालयात १९९६ ते २००१ मधील शैक्षणिक काळ आयुष्यातील अविस्मरणीय काळ आहे. आज या निमित्ताने महाविद्यालयाला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा देत आहोत.
- नवनाथ वाघमोडे, चेतन तुपे, योगेश बोरोटे, माजी विद्यार्थी

आमचे तत्कालीन प्राचार्य देवदत्त दाभोळकर आम्हा ग्रामीण विद्यार्थ्यांचे खरेखुरे देवदत्त होते. त्यांच्या कार्यालयाबाहेर सहकार्यासाठी भेट घेण्यासाठीचा फलक नेहमी होता. फी किंवा अन्य अडचणी सरांनी सहज सोडवल्या. मी, प्रदीप भिडे, डॉ. एम. बी. आबनावे, ॲड. सुरेश कोद्रे व आमच्या ग्रामीण भागातील मित्र परिवाराचा महाविद्यालयाशी कायम जिव्हाळा राहिला. महाविद्यालयाचे खूप खूप अभिनंदन.
- प्रकाश फुलारे, माजी विद्यार्थी

फर्ग्युसन महाविद्यालयाचे आता विद्यापीठात रूपांतर होणार याचा खूप अभिमान वाटत आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाचे १०० वर्षपूर्तीच्या निमित्ताने १९८५ मध्ये बी.एस्सी. (केमिस्ट्री)च्या बॅचचा शिक्षकांसोबतचा फोटोतून आठवणींना उजाळा द्यायला आवडेल.
- ॲड. तुषार मोहन कानभूर, माजी विद्यार्थी

फर्ग्युसन विद्यापीठाला हार्दिक शुभेच्छा. मी वसंत रघुनाथ देसाई, पी.एम.एस. ग्रुप घेऊन फर्ग्युसनमधून बी.एस्सी. उतीर्ण झालो.
- वसंत रघुनाथ देसाई, माजी विद्यार्थी. 

मी फर्ग्युसनची विद्यार्थिनी आहे हे सांगणे माझ्यासाठी नेहमीच अभिमानास्पद आहे. महाविद्यालयातील शिक्षण आणि येथील आठवणींमुळे आयुष्यातल्या कठीण प्रसंगांवर मात करू शकले.
- मनीषा जमदग्नी, माजी विद्यार्थिनी

हे खरचं खूप उत्तम झाले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाशी संबंधित सर्वांना शुभेच्छा.
- पंकज शहा, 

फर्ग्युसन महाविद्यालयाला आता विद्यापीठाचा दर्जा मिळाल्याबद्दल मला सार्थ अभिमान वाटतो.
- रवींद्र देशपांडे, सतीश परदेशी, माजी विद्यार्थी

महाविद्यालय विद्यापीठ होत आहे याचा आनंद होत आहे. महाविद्यालयातील काळ जडण घडण करणारा ठरला.
- डॉ. संजय चाकणे, माजी विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT