पुणे

सांडपाण्याच्या चेंबर मध्ये पडला, परंतु स्थानिकांमुळे वाचला

दौंड शहरात संथ गतीने सुरू असलेल्या अष्टविनायक मार्गावरील सांडपाण्याच्या चेंबरमध्ये एक साडेचार वर्षाचा मुलगा पडला. परंतु, स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे तो बचावला गेला आहे.

प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड शहरात संथ गतीने सुरू असलेल्या अष्टविनायक मार्गावरील सांडपाण्याच्या चेंबरमध्ये एक साडेचार वर्षाचा मुलगा पडला. परंतु, स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे तो बचावला गेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला आहे.

शहरातील भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर चौकात २० नोव्हेंबर रोजी दुपारी हा दुर्देवी प्रकार घडला. अष्टविनायक मार्गांतर्गत काँक्रिटीकरण सुरू असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी अंशतः बंद आहे. आरव (रा. सोलापूर) नावाचा साडेचार वर्षाचा मुलगा त्याच्या नातेवाईक असलेल्या लहान मुलांसमवेत या रस्त्यावरून जात असताना उघडा चेंबर त्याच्या लक्षात न आल्याने तो त्यात पडला. गटांगळ्या खात असतानाच स्थानिक तरूणांनी क्षणार्धात त्याला ओढून बाहेर काढले. आरव हा पूर्णपणे भेदरलेला होता परंतु त्याला समजावून शांत करून तरूणांनी त्याला पाण्याने स्वच्छ केले. एका मिनिटाचा उशीर झाला असता तर त्याला वाचविणे अवघड झाले असते.

दौंड शहरातील श्री सिंधी धर्मशाळा परिसरात वास्तव्य करणार्या मामांकडे आरव सुट्टीसाठी आलेला आहे. अष्टविनायक मार्गाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. संबंधित अधिकारी व कंत्राटदार मुजोर झाले असून ते नगरपालिकेसह कोणालाही जुमानत नसल्याने नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

दौंडचे तहसीलदार तथा नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी संजय पाटील यांनी या बाबत सांगितले की रस्त्याचे काम सुरू करण्यपूर्वी गटार व अन्य कामे पूर्ण करून घेणे अभिप्रेत होते परंतु तसे न करता चेंबर उघडी ठेवण्यात आली आहेत. या बाबत कंत्राटदाराला नोटीस दिली जाईल व आणखी वाट न पाहता नगरपालिकेकडून चेंबर बंदिस्त केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, चार जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT