पुणे

पुणे :..अन् फर्ग्युसन रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सकाळ वृत्तसेवा

पुणे : फर्ग्युसन रस्त्यावर 'थर्टीफस्ट' आणि "न्यू इअर' तोंडावर थाटलेल्या नव्या आणि काही जुन्या बेकायदा स्टॉलधारकांना हटवून या रस्त्यालगतचे पदपथ महापालिकेने शुक्रवारी मोकळा केला. खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांसह सर्वच स्टॉल गुंडाळून ते ताब्यात घेण्यात आले. या पुढे रस्ता आणि पदपथावर अतिक्रमणे केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा दमही व्यावसायिकांना भरला आहे.

या कारवाईत राजकीय आणि अन्य लोकांकडून हस्तक्षेप होऊ नये, यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी स्वत: हजर राहून ही कारवाई केली. या कारवाईमुळे भेदरलेल्या व्यावसायिकांनी पळापळ केल्याने ऐन सायंकाळी म्हणजे, लोकांची वर्दळ असतानाच फर्ग्युसन रस्त्यावर गोंधळ उडाला. या रस्त्यावररील पदपथावर दोन्ही बाजूने बेकायदा व्यावसायिकांनी आपली दुकाने उभारली आहेत. त्यामुळे लोकांना प्रामुख्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना पदपथावरून पायी जाणे अशक्‍य झाले आहे. त्यातच काही व्यावसायिक अरेरावी करीत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यावरून दुकाने उभारण्याच्या वेळी म्हणजे, सायंकाळीच ही कारवाई झाली.

दरम्यान, अशा प्रकारची कारवाई अनेकदा झाली आहे. मात्र, त्यानंतरही दुकानदारांनी आपले बस्तान बसविले होते. त्यामुळे ही कारवाई ही फक्त सोपस्कार राहणार की खऱ्याअर्थाने अतिक्रमणमुक्तीची राहणार असा प्रश्‍न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: जंतर-मंतर आंदोलनानंतर आता शाळांवर अभिजीत दिपकेंचा फोकस! शाळा सुधारा अभियान राबवणार; 'या' जिल्ह्यातून शुभारंभ होणार

‘तुम्ही बीवी पगलू आहात?’ KBC 18 मध्ये अमिताभ बच्चन यांना थेट सवाल; म्हणाले, ‘मी जयाचा...’

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

SCROLL FOR NEXT