fertilizer sakal
पुणे

खतांच्या किंमती शिगेला ; बळीराजा मेटाकुटीला !

दरात सुमारे २०० रुपयांनी वाढ; शेतीमालाच्या भावात घट; शेतकरी हवालदिल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शेतीमालाचे कमी झालेले भाव... रासायनिक खतांच्या वधारलेल्या किमती....डिझेल महागल्याने मशागतींच्या दरात झालेली वाढ...अल्प पाऊस व ढगाळ हवामानामुळे दिवसेंदिवस वाढत्या रोगांचा प्रादुर्भाव.... त्यामुळे करावी लागणारी महागलेल्या औषधांची फवारणी...या चक्रव्यूहात सध्या जिल्ह्यातील बळिराजा अडकल्याने हवालदिल झाला आहे. वाढत्या औषधे, खतांच्या किमतींमुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकी पन्नास किलोच्या पिशव्यानुसार संयुक्त व मिश्र खतांच्या दर १०० ते २०० रुपयांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत महागले आहे. वाढलेल्या खतांच्या किमतीचा विचार करता एका टनामागे सरासरी दोन हजार रुपयांपेक्षा अधिक वाढ झालेली आहे. त्यातच भर म्हणून शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील रांजणगाव सांडस, आलेगाव पागा, नागरगाव, उरळगाव, दहिवडी पारोडी आदी गावात नत्र (युरिया) खताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.

ऊस ,कांदा, तरकारी पिकांना योग्य बाजारभाव मिळत नाही. उत्पादन व खर्च यांचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे सरकारने शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या डिझेल व पेट्रोल तसेच रासायनिक खतास, औषधाच्या दरात सवलत किंवा अनुदान देणे गरजेचे आहे.

- भीमराव काळभोर, शेतकरी- रांजणगाव सांडस

दोन-तीन महिने स्वतःच्या मुलाप्रमाणे जिवापाड जपलेल्या पिकाला सध्या कवडीमोल बाजार भाव मिळत आहे. रात्रंदिवस कष्ट करून हातातोंडाशी आलेले पीक वाढीव खर्चामुळे सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

- हरिभाऊ रणदिवे, शेतकरी, रांजणगाव सांडस (ता. शिरूर)

शेतकऱ्यांना असा बसतोय फटका

  • विक्री व उत्पादन खचामध्ये मोठी तफावत

  • डिझेल दरवाढीमुळे मशागतीचे दर वधारले

  • मजुरीसह वाहतूक खर्चात वाढ

  • लहरी हवामानामुळे फवारणीचा खर्च अधिक

व्यापारीच होतोय मालामाल

टोमॅटो, भेंडी, मिरची, कोबी, फ्लॉवर आदी पिकांना कवडीमोल बाजारभाव तसेच भाजीपाल्याला सुद्धा कमी भाव मिळत आहे. तरीदेखील भाजी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून चांगल्या दराने भाज्यांसह तरकारी मालाची विक्री होत आहे. शेतकऱ्याला वाढीव खर्चाने पिके सोडून देण्याची वेळ आली आहे. मात्र, व्यापारी ग्राहकाकडून जादा दराने विक्री करत आहे. यामुळे व्यापारीच मालामाल होत असल्याचे विदारक चित्र बाजारात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: धाराशिवमध्ये पावसाला सुरुवात

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT