fire.jpg
fire.jpg 
पुणे

किरकटवाडी येथील कंपनीला भीषण आग

निलेश बोरुडे

किरकटवाडी : किरकटवाडी ता. हवेली येथील शिवनगर भागामध्ये असलेल्या 'सनग्लो लाइटिंग सर्विसेस'या विजेची उपकरणे तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास कंपनीतून मोठ्या प्रमाणात धूर दिसण्यास सुरूवात झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. दरम्यान आज रक्षाबंधन असल्याने कंपनीला सुट्टी होती त्यामुळे सुदैवाने आतमध्ये कोणीही नव्हते. आग दिसू लागल्याने कंपनीच्या जवळ राहणारे अॅडव्होकेट सचिन गोगावले यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन केंद्राशी संपर्क साधल्यानंतर तातडीने दोन गाड्या आग विझविण्यासाठी दाखल झाल्या आहेत.

आतमध्ये एलपीजी सिलेंडर असल्याने व आजूबाजूला रहिवासी परिसर असल्याने थोडी चिंतेची बाब असल्याचे अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांनी सांगितले. आग नेमकी कशी लागली हे आत्ताच सांगता येणार नाही, तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे, तसेच आगीवर लवकरच नियंत्रण मिळवले जाईल असेही पाटील यांनी सांगितले.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT