chas 
पुणे

खेड, शिरूरची चिंता मिटली, चासकमान धरणात एवढा साठा 

राजेंद्र लोथे

चास (पुणे) : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील भीमाशंकर खोऱ्यासह चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेली दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढला असून, त्याचा फायदा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास झाला असून, गेल्या छत्तीस तासात धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 12.91 टक्यांनी वाढ होऊन तो 48.29 टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती धरणाचे शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी दिली आहे.

खेड तालुक्याबरोबरच शिरूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेल्या चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होण्यास सुरुवात झाली असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. जून, जुलै व ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला जेमतेम झालेल्या पावसामुळे चालू वर्षी धरण भरणार की नाही, या बाबत साशंकता निर्माण झाली होती. त्यामुळे पूर्ण वर्षभर पाण्याचे नियोजन कसे होणार, याची चिंता लागली होती.  त्याचबरोबर दुष्काळाच्या चर्चा एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या होत्या की या वर्षाची तुलना 1972 च्या दुष्काळाबरोबर करण्यात येत होती.

अखेर वरुणराजाने कृपादृष्टी दाखवत जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बळीराजासह सर्वच नागरिक सुखावले आहेत. पावसामुळे धरण शंभर टक्के भरणार असल्याची आशा निर्माण झाली असून, खरिप हंगामतील पिकांमधूनही उत्पन्न मिळण्याची अपेक्षा वाढली आहे. भीमाशंकर खोऱ्यात पडत असलेल्या संततधार पावसाने भीमा नदी दुथडी भरून वाहते आहे, ओढ्या नाल्यांना पूर आले असून, भात खाचरांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. 

कळमोडी धरण मंगळवारीच शंभर टक्के भरले. या धरणातून होणाऱ्या विसर्गातून येणारे पाणी चासकमान धरणात येत आहे. त्यामुळे चासकमान धरणाचा पाणीसाठा वाढण्यास मदत होत आहे. 8.53 टीएमसी क्षमता असलेल्या चासकमान धरणात आज सायंकाळी सहा वाजता 48.29 टक्के ( 3.66 टीएमसी )  पाणीसाठा झाला असून, धरणात तासाला 6810 द.ल.घ.मी. वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. पावसाचा जोर पाहता येत्या काही दिवसात धरण शंभर टक्के भरेल, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'TET' सक्तीचा नेमका आदेश काय? ११० पानांच्या आदेशावर शासन सुस्पष्ट परिपत्रक काढून दूर करणार संभ्रम; २०१० पूर्वीच्या शिक्षकांना दिलासा मिळू शकतो, पण...

Morning Breakfast Recipe: थंडीच्या दिवसात सकाळी नाश्त्यात झटपट बनवा ब्रोकोली सुप, सोपी आहे रेसिपी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 डिसेंबर 2025

Panchang 11 December 2025: आजच्या दिवशी हळद, बेलफळ चूर्ण किंवा आवळकाठी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे

अग्रलेख - अबोलाचा भात!

SCROLL FOR NEXT