Covid_Center 
पुणे

नर्स आणि महिला बाउंसरमध्ये फ्री-स्टाईल; जंबो कोविड सेंटरमध्ये उडाला गोंधळ

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिवाजीनगर येथील जंबो कोविड सेंटर येथे रखडलेला पगार घेण्यासाठी आलेल्या परिचारीका आणि महिला बाउंसरमध्ये गुरुवारी (ता.२४) तुंबळ हाणामारी झाली. दरम्यान, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पोचलेले हे प्रकरण सामोपचाराने मिटले.

कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी उभारलेल्या जंबो कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या परिचारिका आणि कामगारांचा मागील काही महिन्यांपासून पगार झाला नव्हता. त्यावरुन परिचारिका आणि कामगारांनी प्रशासनाविरुद्ध आंदोलनही केले होते.

दरम्यान, गुरुवारी संबंधीत परिचारिका आणि कामगारांना त्यांचा रखडलेला पगाराच्या मागणीसाठी जंबोमध्ये आले होते. त्याचवेळी परिचारिका आणि वॉर्डबॉय एकत्र आल्याने गोंधळ निर्माण झाला. तेव्हा तेथे असलेल्या महिला बाऊंसर परिचारिकांना समजवण्यासाठी आल्या. तेव्हा त्यांची बाचाबाची झाली. त्यावरुन काही परिचारिका आणि महिला बाऊंसर यांच्यात शिवीगाळ आणि मारहाणीचा प्रकार घडला. या घटनेनंतर सर्वजण शिवाजीनगर पोलिस घटनास्थळी पोचले. मात्र त्यांच्यात सामोपचाराने प्रकरण मिटले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike: दसरा-दिवाळीआधीच दूध महागणार? तब्बल 8 रुपयांची वाढ! सरकारला 3 दिवसांचा अल्टिमेटम

Asian Games 2026: मुंबईच्या पोरीची जपानमध्ये हवा! Quimcy Dsouza ऐतिहासिक पदक जिंकण्याच्या उंबरठ्यावर; ती खेळते, तो Teqball नक्की आहे तरी काय?

शेतकरी दुष्काळाने होरपळतोय, नेते खातायत सुकामेवा, आढावा बैठकीत काजू बदामचा नाश्ता

IIT Bombay ChatGPT Incident : IIT बॉम्बे विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर अधिकृत खुलासा; शिस्तभंगाची कारवाई केली होती का? संस्थेने सांगितलं सत्य

प्रसूतीनंतर ५० दिवस मृत्यूशी झुंज, स्तनदा मातेला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न; उपचारानंतर मिळालं जीवनदान!

SCROLL FOR NEXT