पुणे

पुणे : व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक आनंद रिठेविरुद्ध गुन्हा

पांडूरंग सरोदे

पुणे ः नगरसेवक पदाचा गैरवापर करून नगरसेवकाने जुन्या सायकली दुरुस्त करणाऱ्या व्यावसायिकाच्या घरावरील मोबाईल टॉवर पाडून तसेच घरही पाडण्याची धमकी देत मानसिक त्रास दिल्याच्या कारणावरुन व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना सोमवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास दत्तवाडी येथे घडली.

संजय महादेव सुर्वे (वय 53, रा. दत्तवाडी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी शशांक संजय सुर्वे (वय 26) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन भाजप नगरसेवक आनंद रमेश रिठे (रा. साईबाबा मंदिराजवळ, दत्तवाडी) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, जाणीवपुर्वक अपमानित करुन मानसिक त्रास देणे व धमकी देणे, या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सुर्वे यांचे म्हसोबा चौकामध्ये "पौर्णिमा सायकल मार्ट' नावाचे जुन्या सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. सुर्वे यांनी त्यांच्या मालकीच्या "महादेव बिल्डींग'च्या छतावर जिओ मोबाईल कंपनीचा नवीन टॉवर बसविला होता. सुर्वे हे दत्तवाडी प्रभाग क्रमांक 29 मध्ये राहात असताना प्रभाग क्रमांक 30 चे नगरसेवक आनंद रिठे याने महापालिकेकडून टॉवर काढून न टाकण्याच्या बदल्यात त्यांच्याकडे पैसे मागितले. मात्र सुर्वे यांनी रिठे यास पैसे दिले नाहीत. त्यामुळे त्याने महापालिकेकडे अर्ज करून नगरसेवक पदाचा गैरवापर करून फिर्यादीच्या वडीलांच्या बिल्डींगच्या छतावरील रिलायन्स कंपनीचा नवीन टॉवर महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फौजफाटा आणून 10 जुन रोजी काढून टाकला. त्यानंतर सुर्वे यांचे राहते घर देखील पाडून टाकणार अशी धमकी देऊन फिर्यादीच्या वडीलांना रिठे याने सतत मानसिक त्रास दिला.

रिठे याच्या सातत्याने होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून व फिर्यादीच्या वडीलांच्या बिल्डींगवरील टॉवर काढल्याची मानहानी सहन न झाल्याने व घर पाडण्याच्या चिंतेने फिर्यादीचे वडील संजय सुर्वे यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या पौर्णिमा सायकल नावाच्या सायकल दुरूस्तीच्या दुकानामध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. सुर्वे हे नेहमी सकाळी आठ वाजता त्यांचे आवरुन दुकानामध्ये जात होते. मात्र सोमवारी पहाटेच्या सुमारासच ते दुकानामध्ये आले. तेथे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. साडे सहा वाजण्याच्या सुमारास दुकानामध्ये वृत्तपत्र टाकण्यासाठी आलेल्या मुलाच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर त्याने दत्तवाडी पोलिस व सुर्वे यांच्या कुटुंबीयांना खबर दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honey Trap Miraj : बुलाती है मगर जानेका नहीं! सोशल मीडियाचा नाद लावून पोरं बाद करणारी टोळी, मिरजेत फोटो, व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; कोल्हापूर कनेक्शन

Jalna Crime: पोलिस रेकॉर्डवरील एकाचा खून; जालन्यात थरार, जमिनीच्या वादातून चौघांकडून सशस्त्र हल्ला

नेते अन्‌ कार्यकर्त्यांनो सावधान ! 'साेलापुरात बाईक रॅली काढाल तर गुन्हा दाखल'; पोलिस आयुक्तांचे काय आहेत नियम?

Solapur News: 'साेलापूर जिल्ह्यातील ७८ हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित'; शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई मिळेना..

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

SCROLL FOR NEXT