पुणे

सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पांडुरंग सरोदे -सकाळ वृत्तसेवा

आक्षेपार्ह व अश्‍लिल मजकुर, छायाचित्रे प्रसिद्ध करीत सुरू होती बदनामी, सायबर पोलिसांकडून कारवाई

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, संभाजी महाराज यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी फेसबुक पेज, व्हॉटस्‌अप ग्रुवर बदनामीकारक, आक्षेपार्ह व अश्‍लिल मजकुर, छायाचित्र प्रसिद्ध करण्याचा प्रकार काही जणांनी केला होता. सायबर पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत 14 जणांसह आणखी काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नाना पंडीत, वैभव पाटील, महेश गहुडले, धनंजय जोशी, सोनाली राणे, जयसिंग मोहन, संदिप पाटील, शौर्यन श्रीकृष्ण चोरगे, अतुल अयाचित, राजेंद्र पवार, राज पाटील, मुकेश जाधव, स्वरुप भोसले यांच्यासह इतर समाजमाध्यम वापरकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आकाश चंद्रकांत शिंदे (वय 24, रा. कोथरुड) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 4 मे 2021 या दिवशी व त्यापुर्वी "राजकारण महाराष्ट्राचे' हा फेसबुक ग्रुप, इंटिलेक्‍यच्युअल फोरम हा व्हॉटअस्‌अप ग्रुप, कोमट बॉईज ऍन्ड गर्ल्स फेसबुक ग्रुप, सीएम देवेंद्र फडणवीस फॅन क्‍लब फेसबुक ग्रुप व ट्विटर या समाजमाध्यमांवर अश्‍लिल व बदनामीकारक मजकुर प्रसिद्ध करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित फेसबुक, व्हॉटस्‌अप, ट्विटर अशा विविध ग्रुपवर विविध समाजघटकात शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह मजकुर प्रसिद्ध करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अशा घटनात्मक पदांच्या व प्रतिष्ठीत राजकीय व्यक्तीमत्वांच्या लौकीकास बाधा आणण्याकरीता त्यांचे छायाचित्र मॉर्फ करण्यात येत होते. तेथे घाणेरडे व अश्‍लिल छायाचित्र, मजकूर वापरून त्यांची बदनामी केली जात होती. तसेच ब्राम्हण व ब्राम्हणेतर जातींमध्ये तेढ निर्माण करणारे मजकुर प्रसिद्ध केले आहे. तसेच ट्विटरवर स्वरुप भोसले याने छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी देखील अश्‍लिल मजकूर लिहून तो प्रसिद्ध केला. या प्रकारामुळे राज्यातील जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक डी. एस. हाके करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump New Tariffs : ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब; भारतासह १६ देश अमेरिकेच्या निशाण्यावर, व्यापार कराराला धक्का बसण्याची शक्यता

Vijay Government Takes Action: विजय सरकारची आमदाराविरुद्ध कारवाई; महिला जिल्हाधिकाऱ्यांना अश्लील संदेश पाठविल्याप्रकरणी गुन्हा

Maharashtra Education News: मोठा निर्णय! आता ‘खासगी’ शाळांमध्ये लॉटरीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश; खासगी शाळांची थांबणार मनमानी; प्रवेशासाठी वयोमर्यादाही निश्चित

Latest Marathi News Live Update : अंबाबाई मंदिरात सजला दीपोत्सव

Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची आणखी दोन स्थानके आजपासून प्रवाशांसाठी खुली, प्रवाशांसाठी मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT