Filed a case against a close associate of Gaja Marane for cutting the cake in the street and crowd gathered  
पुणे

गजा मारणेच्या जवळच्या साथीदाराविरुद्ध समर्थ व विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

सकाळवृत्तसेवा

पुणे : भर रस्त्यातच केक कापत असतानाच एका तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुंड गजा मारणे याचा साथीदार रुपेश मारणे याच्याविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच विश्रामबाग पोलिस ठाण्यातही त्याच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. रस्त्यात केक कापून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी रुपेश कृष्णराव मारणेविरुद्ध जमाबंदीच्या आदेशाचा भंग, बेकायदेशीर गर्दी जमविवे आणि कोविडच्या अनुषंगाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या कलमांनुसार, गुन्हे दाखल करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, बीट मार्शल सचिन जाधव व बालाजी शिंदे हे दोघेजण 14 फेब्रुवारीला रात्रगस्तीच्यावेळी सोमवार पेठ पोलीस चौकीजवळ आले होते. त्यावेळी धनराज गिरी शाळेच्या बाजुने घाबरून धावत आलेल्या एक तरुणाने त्यास "गुंड रुपेश मारणे हा त्याच्या साथीदारांसह रस्त्यावर उभा राहून केक कापत होता. त्यावेळी त्याने मला "माझ्याकडे काय बघतोस, तुलाही केकसारखे कापून टाकीन'' असा दम दिला. या प्रकारानंतर पोलिस कर्मचारी तेथे गेले, त्यावेळी रुपेश मारणे व त्याचे साथीदार तेथून पळू गेले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, रुपेश मारणे व त्याचे 20 ते 30 साथीदार कोथरुड येथून 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता वेगवेगळ्या गाड्यांमधून वाहतुकीस अडथळा ठरेल अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरुन चालत जाऊन श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर, बाबु गेनू मंदिर येथे येऊन दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यातही बेकायदेशीर गर्दी जमविणे, कोविडसंबंधी नियमांचे पालन न करणे यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभिजीत गाडे यास पोलिसांनी अटक केली आहे. 

कोथरुड पोलिसांकडून आणखी सहा जणांना अटक 
कोथरुड पोलिस ठाण्यात गजा मारणे व त्याच्या साथीदारांवर यापुर्वीच जमाबंदीच्या आदेशाचा भंग, बेकायदेशीर गर्दी जमविणे आणि कोविडच्या अनुषंगाने नियमांचे उल्लंघन करणे, यानुसार गुन्हा दाखल आहे. त्यानुसार पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात असताना पोलिसांनी समीर पाटील, अतुल ससार, राहूल उभे, सागर हुलावळे, रामदास मालपोटे व कैलास पडवळ यांना अटक केली. 
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB चा फलंदाज Unstoppable ! १४ चेंडूंत ६४ धावा कुटून संघाला मिळवून दिला दणदणीत विजय; KKR ला होतोय पश्चाताप

Latest Maharashtra News Updates : मराठा आरक्षणावरील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर डबल बेड मॅट्रेस अन् सोफ्यासह दुरुस्तीचा खर्च तब्बल ४० लाख; इतकी उधळपट्टी कशाला? विरोधकांचा सवाल

Gemini Photo Trend : गुगल जेमिनीवर तुम्ही फोटो बनवताय, पण त्या फोटोचे पुढे काय होते? खरंच यामुळे डेटा लिक होतो का..जाणून घ्या सत्य

Maruti car price cut : दसरा, दिवाळीच्या आधी ‘मारूती’चा बडा धमका! कारच्या किंमतींमध्ये मोठी कपात जाहीर

SCROLL FOR NEXT